सातारा:मराठी भाषा संवर्धन आणि विकासात मराठी विश्वकोशाचे मूलभूत कार्य – मा. राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सातारा:मराठी भाषा संवर्धन आणि विकासात मराठी विश्वकोशाचे मूलभूत कार्य – मा. राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन




मराठी भाषा संवर्धन आणि विकासात मराठी विश्वकोशाचे मूलभूत कार्य – मा. राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन

वाई : मराठी भाषा संवर्धन आणि विकासात मराठी विश्वकोश मूलभूत कार्य करत असून ते सर्वांनाच प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मा. राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. वाई येथील महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मराठी विश्वकोश कार्यालयास त्यांनी आज सदिच्छा भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, पोलीस उप अधिक्षक शीतल जानवे-खराडे, प्रभारी तहसीलदार वैशाली जायगुडे आदी प्रमुख उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक धोरणात व्यावसायिक आणि उच्च शिक्षण मातृभाषेतून द्यायचे आहे. यासंदर्भात मराठी विश्वकोशाने यापूर्वीच विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयावर केलेले नोंदलेखनाचे कार्य मार्गदर्शक असल्याचे मत मा. राज्यपालांनी व्यक्त केले तसेच विश्वकोश मंडळ करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

सुरुवातीस मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे यांनी विश्वकोश खंड भेट देऊन मा. राज्यपाल यांचे स्वागत केले. याप्रसंगी डॉ. शामकांत देवरे यांनी मराठी विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया सांगून विश्वकोशाच्या सर्व माध्यमांची आणि भविष्यातील प्रकल्पांची माहिती दिली.

मा. राज्यपाल यांनी विश्वकोश ग्रंथालयास भेट दिली तसेच सर्व संपादकांशी हितगुज करत कामकाज जाणून घेतले. यावेळी विद्याव्यासंगी संपादक डॉ. जगतानंद भटकर, डॉ. स्नेहा खोब्रागडे, आनंद गेडाम, सरोजकुमार मिठारी, प्रीती साळुंके, संतोष गेडाम, रवींद्र घोडराज, पल्लवी गायकवाड, शिल्पा भारस्कर, वर्षा देवरुखकर, लिपिक सचिन भाडळकर, वर्षा नाईक आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई