जळगाव जिल्ह्यात येणारा ५ लाखांचा गुटखा वाहनाला अपघात ...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जळगाव जिल्ह्यात येणारा ५ लाखांचा गुटखा वाहनाला अपघात ...



जळगाव जिल्ह्यात येणारा ५ लाखांचा गुटखा  वाहनाला अपघात ...

 लोकसंदेश न्यूज  जळगाव प्रतिनिधी शेख जावीद

  राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा चारचाकी वाहनाद्वारे घेऊन जात असतांना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहनाचा बोदवड रोडवर अपघात झाला.वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये ४ लाख ८० हजार ४२८ रूपयांचा प्रतिबंधीत गुटखा व वाहन अंदाजे किं.५ लाख ५० असा एकूण १० लाख ३० हजार ४२८ रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ३ मे रोजी जप्त केला आहे.सागर आनंदा कपले रा. तरोडा ता. मुक्ताईनगर हा प्रतिबंधीत असलेला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने झायलो वाहन क्र. एमएच १२ जीझेड ४१६५ मध्ये घेऊन जात होता. बोदवड डॉ. चोपडे यांच्या शेताजवळील वाहनावरील ताबा सुटला व वाहन झाडाला धडकले.



 अपघाताची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे, शहर पोलीस वाहतुकीचे महेश चोपडे, शरद मुंडे, पो. कॉ. वसीम, पो.कॉ.सोनोने, तसेच पोलीस कर्मचारी आनंद माने यांनी घटनास्थळी जाऊन सदर अपघातग्रस्त वाहनाची तपासणी केली.वाहन चालक जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारा करिता डॉ राहुल चोपडे यांच्या रुग्णालयात पाठवण्यात आले व वाहनातील प्रतिबंधित असलेला गुटखा तसेच अपघातग्रस्त झायलो वाहन अंदाजे कि ५,५०,००० रु. असा एकूण १०,३०, ४२८ रु. चा मुद्देमाल दिसून आला सदर वाहन चालक व मालक याचे विरुद्ध भादवि कलम व अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शना खाली पोउपनि सुरेश रोकडे यांचे तपास करीत आहेत.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली