दौलतराव पिसाळ
लोकसंदेश न्यूज सातारा जिल्हा प्रमुख
सातारा:वाईच्या पसरणी घाटात अज्ञाताने
लावलेल्या आगीत वनसंपदा जळुन खाक झाल्याने नागरिकांन मध्ये संतापाची लाट .
वाई ते पाचगणी जाणार्या पसरणी
घाटात अज्ञाताने भर दिवसा लावलेल्या आगी मुळे डोंगर माथ्यावर ऊन्हाचे चटके सहन करत
पिण्याच्या पाण्याची प्रतिक्षा करत असणारी वनसंपदा जळुन खाक झाल्याने वृक्षप्रेमीण सह वाई तालुक्यातील नागरिकांन मध्ये संतापाची लाट उसळली आहे .
सध्या राज्यासह देशातील शाळांना ऊन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने पाचगणी महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकानांन सह प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमाचे व शौर्याचे प्रतिक पाहण्यासाठी पर्यटक जात असतात
अशातच कोणी शिगारेट पिणार्या
पर्यटकांनेच पेटत्या सिगारेटचा तुकडा घाटात टाकल्यानेच वनवा लागला त्यात सरपटणारे प्राण्यांन सह पशु पक्षांची घरटी आणी
अंडयांन बरोबरच मोठ मोठाली वृक्ष
संपत्ती जळुन खाक झाल्याने घाटातील डोंगर काळे कुट्ट झाल्याने
वृक्ष प्रेमीनसह वाई तालुक्यातील जनते मधुन संतापाची लाट उसळली आहे .
वनविभागाने नागरिकांचे सहकार्य घेऊन वनवा लावणार्यांची शोध मोहीम कार्यक्रम राबविण्यासाठी
पुढाकार घ्यावा अशी मागणी वाई तालुक्यातील जनते मधुन होत आहे .
संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई.