लोकसंदेश न्यूज वाई प्रतिनिधी
बारामती येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन मध्ये आर्या पोळचे यश ..
कवठे ता. वाई येथील आर्या विनोद पोळ या विद्यार्थिनीने बारामती येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन बारामती येथे झालेल्या इयत्ता ८ वीं ते १० इयत्ताच्या प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवले.
शारदाबाई पवार विद्यानिकेतन बारामती येथे सन २०२३ साठी इयत्ता ८ वी ते १० वी साठीच्या रिक्त जागांच्या प्रवेशासाठी नुकतीच प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. शारदाबाई पवार माध्यमिक विद्यालय हे राज्यात व देशात नावाजलेले विद्यालय असल्याने आपल्या पाल्याला या विद्यालयात प्रवेश मिळावा अशी बहुतांश पालकांची इच्छा असते. यंदा या परीक्षेसाठी २२०० परीक्षार्थी परीक्षेस बसले होते. व यामध्ये गुणवत्तेमध्ये येणा-या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देणार असल्याचे विद्यालयाने घोषित केले होते.
त्यानुसार इयत्ता ९ वीसाठीच्या प्रवेश परीक्षेसाठी वाई तालुक्यातून आर्या विनोद पोळ हि बसली होती. या परीक्षेसाठी विविध राज्यातून परीक्षार्थी बसले होते. त्यामधून आर्या पोळ हिने गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवल्याने तिला या विद्यानिकेतन मध्ये प्रवेश मिळाला आहे. तिच्या या उज्वल यशाबद्दल तिचे सरपंच मंदाकिनी पोळ, उपसरपंच शिवाजी डेरे, माजी सरपंच श्रीकांत वीर,तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पोळ, माधवराव डेरे, मारुती पोळ, संदीप पोळ, संतोष पोळ,शिवाजी करपे, शशिकांत करपे, अविनाश देवकर, सागर डेरे व कवठे ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य व कवठे गावातील विविध संस्थांच्या पदाधिका-यांनी तिचे अभिनंदन केले.
चौकट : शारदाबाई पवार विद्यानिकेतनमध्ये आर्या पोळ हिची निवड झाल्याचे कळताच आनंद झाला. आर्या इयत्ता ७ वी व ८ वी मध्ये श्री शिवाजी विद्यालय सुरूर येथे प्रथम क्रमांकांने उत्तीर्ण झाल्याने ती या परीक्षेत उज्वल यश संपादन करणार अशी खात्री होती व तिने हे यश मिळवल्याने निश्चितच आमच्यासाठी हि अभिमानाची बाब असून तिने मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन गगनभरारी घ्यावी व कवठे गावचे नाव उज्वल करावे असे आम्हाला वाटते... राजेंद्र पोळ.. तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य कवठे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई