लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी सांगली
नांद्रे गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. यामाध्यामातून रस्ते, गटारीसह अन्य विकास कामे पूर्ण होतील. आणखी निधी लागला तरी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली. नांद्रे येथे ७ कोटी ७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उदघाटन आमदार गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.
सांगली विधानसमा क्षेत्रातील नांद्र गावामध्ये ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरवणे ग्रामविकास निधी अंतर्गत संजय पाटील घरटे सुरेश तांदळे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (५ लाख ७४ हजार) लिंगायत स्मशानभूमी मध्ये अंतर्गत रस्ते कॉक्रिटीकरण करणे (११ लाख) अण्णासो पाटील डेअरी माजी मंडई ते विकास यादव पाटील घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (८ लाख ६१ हजार), शरद पाटील नगर येथील असिफ अपराध पर ते दादा चौगुले घरापर्यंत आर.सी.सी. गटर करणे (६ लाख ५० हजार) तसेच अर्थ अर्थसंकल्पीय बजेट मधून वसगडे फुलते नांदे गावापर्यंत चा रस्ता मजबुतीकरण व रुंदीकरण करणे ३ कोटी ९८ लाख रुपये व राज्यमार्ग क्रमांक १४२ ते नावरसवाडी गाव ते खोतवाडी गावापर्यंतचा रस्ता सुधारणा करणे २ कोटी ७८ लाख रुपये आदी कामांचा यामध्ये समावेश आहे.
आमदार गाडगीळ यांनी यावेळी मुस्लिम कब्रस्तान व बॅडमिंटन हॉल च्या बांधकामाची पाहणी केली या दोन्ही कामासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पंचायत समिती माजी सभापती राहुल सकळे, बाळासाहेब पाटील मुंडू हरोले रावसाहेब पाटील, शुभम महाजन, मुबारक मुजावर, सेफ मुजावर, अरुण तांदळे, प्रदीप मदने, संदीप पाचोरे, सागर माने, बाबासो कोगनोले, शीतल पाटील, आयुब कागदी, वीरेंद्र पाटील आदी मान्यवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्या भागातील नागरिक उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्राइव्हेट लिमिटेड मुंबई