लोकसंदेश वाई सातारा प्रतिनिधी दि.१३
राज्य सरकारचा आनंदाचा शिधा हा गरिब कुटुंबीयांना बळ देणारा उपक्रम .विश्वजीत पिसाळ .
ओझर्ड ता.वाई येथील शेतकरी जिवनोध्दार,विकास सेवा सोसायटी
मार्फत स्वस्तधान्य दुकान चालविले जाते या दुकाना मार्फत गोरगरिबांन
साठी राज्य सरकारच्या वतीने आणी वाई तहसील कार्यालयातील पुरवठा
विभागाच्या मार्गदर्शना खाली आनंदाचा शिधा या योजने अंतर्गत
१ किलो साखर १ किलो तेलपुडा १किलो हरभरा डाळ १ किलो रवा
इत्यादी साहित्यांचे वाटप ओझर्डे कडेगाव खानापुर स्टॉप कदमवाडी
येथील गोरगरिब रेशनींग कार्ड धारकांना हा शिधा विना तक्रार बिनचुक युवानेते विश्वजीत पिसाळ सोसायटीचे चेअरमन सुरेश फरांदे जेष्ठ नेते भास्कराव निकम ग्रामपंचायत सदस्य शेखर फरांदे सचीव अमोल पिसाळ शारुख पिसाळ महेश फरांदे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत व हस्ते वाटप करण्यात आले असल्याची माहिती विश्वजीत पिसाळ यांनी दिली .
येथील शेतकरी विकास सेवा सोसायटीच्या रेशनींग दुकाना मार्फत राज्य शासनाने गोरगरिबांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य उपाशी पोटी झोपु नये या साठी गहू तांदूळ मोफत त्या बरोबरच आनंदाचा शिधा या योजने अंतर्गत जीवनावश्यक साहित्याचे वाटप आमच्या दुकाना मार्फत दुकान चालक महेश फरांदे हे बिनचूक विना तक्रार प्रत्येक रेशनींग कार्ड धारकांन पर्यंत पोहोंचविण्याचे प्रामाणिक काम करत असतात
.त्या
मुळे सर्व कार्ड धारक समाधानी असतात त्या साठी वाई तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेतील अधिकारी असलेले अतुल मर्ढेकर हे
सतत मार्गदर्शन करत असतात त्या मुळे येथील स्वस्त धान्य दुकानात धान्य वाटपात कायम पारदर्शकता
ठेवण्या साठी मदत होते . आमचे श्रध्दास्थान असलेले कै.बाळासाहेब पिसाळ (खेर काका ) आणी कै.हणमंतराव पिसाळ नाना यांनी गोरगरिबांन साठी अथक परिश्रम घेवुन उभ्या केलेल्या या संस्था आहेत त्या नेहमीच वाई तालुक्याच्या पटलावर विकास कामांन मध्ये सदैव प्रथम क्रमांकावर असतात असे गौरव
उदगार चेअरमन सुरेश फरांदे यांनी काढले .
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.