महाराष्ट्र राज्यस्तरीय संविधान पाठांतर स्पर्धेचे आयोजन....
भव्य महाराष्ट्र राज्यस्तरीय संविधान पाठांतर स्पर्धा.
सदर स्पर्धेचे आयोजन महेंद्र कणसे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आप झाडूसेना आणि राजकुमार राठोड सह समन्वयक महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली आप झाडूसेना सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अश्फाक शेख यांच्या संकल्पनेतून जिल्हा समिती च्या वतीने घेण्यात येणार असून नुकतेच
*ज्येष्ठ निर्भीड पत्रकार निखिल वागळे सर* यांच्या हस्ते संविधान प्रस्तावना पाठांतर स्पर्धेचे फेसबुक पेज जाहीर करण्यात आले .
यावेळी झाडूसेनेचे आप महाराष्ट्र सह समन्वयक राजकुमार राठोड जिल्हा कार्याध्यक्ष अश्फाक शेख जिल्हा सचिव विनोद मोरे तसेच शासकीय योजना जिल्हा प्रसारक मुजफ्फर सनदि आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर स्पर्धा आयोजन करण्याची उद्देश एकच आहे संविधान विषयी जनजागृती आणि लहान वयातच मुलांना संविधानाविषयी ज्ञानप्राप्ती. सदर स्पर्धा ह्या पहिले ते चौथी पाचवी ते सातवी तसेच आठवी ते दहावी अशा तीन गटात विभागली जाणार असून स्पर्धेतील विषय
इयत्ता पहिली ते चौथी :- संविधानाची प्रस्तावना
इयत्ता पाचवी ते सातवी :- संविधान मूलभूत कर्तव्य
इयत्ता आठवी ते दहावी :- प्रस्ताविकेतील मुलभूत घटकांचे विश्लेषण
स्पर्धेतील नियम व अटी
प्रत्येक स्पर्धकाने दिलेल्या फेसबुक लिंक वरती तीन मिनिटे आपले वक्तृत्वाची मांडणी न पाहता फेसबुक लाईव्ह करण्याची आहे.
स्पर्धेचा कालावधी दिनांक आणि बक्षीस समारंभ आपल्या आपल्या ग्रुप वरती आपणास कळविले जाईल
कोणतीही शंका असल्यास वैयक्तिक नंबरला आपण व्हाट्सअप करू शकता
8788110062 9422411782.
तरी सर्व स्पर्धकांना पालकांना नम्र विनंती की सदर स्पर्धेत सहभाग नोंदवून आपण यामध्ये सहभाग व्हावा आणि संविधान प्रसार आणि प्रचार यामध्ये हातभार लावावा. कारण भारतीय संविधान एक जिवंत दस्तावेज असून देशातील तमाम नागरिकांना सामाजिक आर्थिक शैक्षणिक धार्मिक राजकीय सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्याचा आशय अंतर्भूत आहे समस्त भारतीय नागरिकांना सर्व प्रकारचा न्याय स्वातंत्र्य समता देऊन त्यांच्यामध्ये बंधुता प्रवर्धित करण्याचा निर्धार केलेला आहे त्याला अनुसरून अनुच्छेद 1 ते 395 हे एकूण 22 भाग असून 12अनुसूची आहेत अशा या संविधानाचा प्रचार प्रसार शालेय जीवनापासून मुलांच्या मध्ये तसेच पालकांच्या मध्ये सातत्याने व्हावा याकरिता संविधानाचे सार असलेली प्रास्ताविका व त्यात असलेले मूलभूत घटक याचे पाठांतर व्हावे या व निमित्ताने या संविधानाचे वाचन अवलोकन होईल आणि त्याला त्याबद्दलची गोडी निर्माण होईल या संकल्पनेतून आम्ही वरील प्रमाणे संविधान पाठांतर स्पर्धा आयोजित करत आहोत
सदर स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील विविध संघटना. तसेच नवहिंद प्रतिष्ठान व शिवसेनेचे शंभुराज काटकर समस्त मुस्लिम समाज समितीचे असिफभाई बावा . युनायटेड मुस्लिम फोरम महाराष्ट्र चे सलीम शेख .बी एस फोर संविधान महा जनजागरण समितीचे राजू कांबळे आर पीआय खरात गट टिपू भाई पटवेकर उपाध्यक्ष महाराष्ट्र सोहेल इनामदार उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र एडवोकेट अमित शिंदे, नागरिक संघटनेचे सतीश साखळकर तसेच विविध संघटनांनी सदर स्पर्धेला सहकार्य केले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.