जळगांव:कर्नाटक राज्यात कॉंग्रेसची सत्ता पाचोर्यात जल्लोष

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जळगांव:कर्नाटक राज्यात कॉंग्रेसची सत्ता पाचोर्यात जल्लोष




कर्नाटक राज्यात कॉंग्रेसची सत्ता पाचोर्यात जल्लोष....

जळगाव लोकसंदेश प्रतिनिधी शेख जावीद

कर्नाटक राज्यातील सत्तेत कॉंग्रेस ची निर्विवाद सत्ता बसल्याने पाचोरा कॉंग्रेस ने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी ढोल-ताशा फटाक्यानी जल्लोष करत पेढे वाटप करण्यात आले भाजपा ला कंटाळून महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी याच्या विरोधात कर्नाटक च्या जनतेने कॉंग्रेस ला एकहाती सत्ता देत लोकशाही ला माननारे राज्य असल्याचे सिद्ध केले आहे. या कॉंग्रेस च्या विजयाचा जल्लोष पाचोरा कॉंग्रेस ने केला आहे.


 यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला तर ढोल-ताशा वाजवुन पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंनद साजरा केला. तर शहरातील नागरिकांना पेढे वाटण्यात आले. यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, महीला जिल्हा प्रतिनिधी अॅड मनिषा पवार,शंकर सोनवणे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, ओबीसी सेल सरचिटणीस, संदीप पाटील, अल्ताफ शेख, रहीम शेख, एसी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, प्रकाश भिवसणे, जलील शाह सुभान शाह, अक्रम शेख,अकलाख शेख, जुनेद खान, जावेद खान, आसिम मौलाना, परवेज खान आदि उपस्थितीत होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.