लोकसंदेश
वाई प्रतिनिधी दि .१७
सातारा:वाईत कारने तिन दुचाकींना ऊडवल्याने ६ जण गंभीर जखमी .
तर ३ वर्षीय बालकाला हात गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त ...
वाई शहरातील ब्लॉसम इंग्लिश मिटयम स्कुलच्या चौकातील पटेल चिकन शॉप समोर कारने ३ दुचाकींना पाठी मागुन जोराची धडक देवुन झालेल्या भिषण अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असुन त्यात एका तिन वर्षीय बालकाला आपला डावा हात
गमवावा लागला आहे . दुर्दैवाने
लहान बालकावर काहीच चुक नसताना या वयात आपला हात गमवण्याची वेळ यावी हे चित्र पाहताच घटना स्थळावर उपस्थित पोलिस अधिकारी पोलिस कर्मचारी आणी नागरीकांन मधुन हळ हळ व्यक्त केली जात होती .
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वेळे ता.वाई येथील रहिवासी असलेले गुलाबराव हरिभाऊ जाधव वय ६५ हे त्यांच्या घरात मुलाचे लग्न असल्याने ते आपल्या मालकीची कार घेवुन वेळे गावा कडुन कुटुंबियांना सोबत घेऊन नवीन कपडे शिवायला टाकण्या साठी वाई शहरात जात असताना त्यांची कार सायंकाळी
पाच वाजण्याच्या सुमारास ब्लॉसम स्कुलच्या चौकात असणार्या पटेल चिकन शॉप समोरील स्पीडब्रेकर जवळ आली त्या वेळी त्यांच्या पुढे तिन मोटर सायकली चालल्या होत्या
पण पुढे स्पीडब्रेकर असल्याने दुचाकी चालकांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी करुन स्पीडब्रेकर पास करत असतानाच
पाठी मागुन येणार्या कारचा ब्रेक कार चालकाला न लागल्याने कारने
पुढील तीन दुचाकी चालकांना पाठी
मागुन जोराची धडक देवुन झालेल्या भिषण अपघातात संगीता अरुण भिसे वय ३० राहुल अरुण भिसे वय २८ सोनाली नारायण भिसे वय २१
फाजल रुबा पटेल वय २७ शेर मोहम्मद पटेल वय ६ आणी सलमान अली पटेल वय ३ हे गंभीर जखमी झाले आहेत .
या गंभीर अपघाताची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना समजताच तेआपले सहकारी सहाय्यक पोलिस निरिक्षकआशीष कांबळे पिएसआय के.डी.पवार हवलदार मदन वरखडे
महिला हवलदार एस.एस.मुजावर श्रीनिवास बिराजदार .दाभाडे . नेवसे.श्रीकांत कांबळे .यांना सोबत घेऊन अपघात स्थळावर दाखल झाले .
त्यांनी अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालय पाठउन
अपघात ग्रस्त कार आणी गुलाबराव हरिभाऊ जाधव वय ६५ राहणार वेळे ता.वाई यास ताब्यात घेवुन त्यांच्या वर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .त्याचा अधिक तपास पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस निरिक्षक आशीष कांबळे हे करीत आहेत .
वाईच्या डिवायएसपी शितल जानवे खराडे यांनी घटना स्थळाला भेट देवुन अपघाताची माहिती घेवुन रुग्णालयात जावुन जखमींची विचारपुस केली .
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.