वाई लोकसंदेश प्रतिनिधी
सातारा:भुईंज पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत ८ दुचाकीसह सोन्या चांदीचे दागिने असा ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त .
पोलिस ठाण्याच्या अधिकारी आणी पोलिस कर्मचार्यांनी घरफोड्या करुन सोन चांदी आणी रोख रकमेसह जिल्ह्याच्या विविध परिसरातुन दुचाकी वाहने चोरणारा पोलिसांना नेहमीच गुंगारा देवुन चपळाईने पळून जाणारा ऊडतारे ता.वाई येथील रहिवासी असलेला अट्टल गुन्हेगार योगेश संदीप बाबर वय १९ वर्ष याला सापळा रचून ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने भुईंज पोलिस ठाणे हद्दीत २ घरफोड्या वाई पोलिस ठाणे हद्दीत १ शिरवळ पोलिस ठाणे हद्दीत १ आणी ४ ठिकाणाहून दुचाकी चोरुन नेहल्याची कबुली सपोनि रमेश गर्जे यांच्या समोर दिली .
भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की २४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास तक्रारदार
सौ.शुभांगी संजय साबळे, वय - ४० वर्षे, रा. उडतारे ता. वाई या शेतात गेल्या असताना कोणीतरी अज्ञात
चोरटयाने दरवाजा शेजारी असणार्या देवळीत ठेवलेली घराची चावी घेवुन घरातील कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम
चोरुन नेहल्याची तक्रार भुईंज पोलिस ठाण्यात दाखल होताच भल्या भल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात तरबेज असणारे भुईंज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांनी गंभीर दखल घेवुन हा चोरीचा गुन्हा तातडीने उघडकीस आणण्यासाठी
पोलिस ऊप निरिक्षक रत्नदीप भंडारे पोलिस हवलदार बापुराव धायगुडे आनंदा भोसले जितेंद्र इंगुळकर शंकर घाडगे रवीराज वर्णेकर सागर मोहिते सोमनाथ बल्लाळ सचिन नलवडे यांचे पथक तयार करुन त्यांना मार्गदर्शन करुन हा गुन्हा उघडकीस आणण्या साठीची जबाबदारी सोपवली .
हे पथक गुन्ह्याचा तपास करत असताना असे लक्षात आले कि हि
घरफोडी कोणीतरी गावातीलच
ओळखीच्या माणसांने की ज्याला चावी कोठे ठेवतात हे माहित आहे त्यानेच हि चोरी केली असावी अशा संशया पर्यंत हे पथक पोहचले .
तक्रारदार यांचे घराचे शेजारी राहणारे,तसेच गावातील त्यांचे ओळखीच्या लोकांकडे पथकाने तपास केला परंतु चोरीच्या
अनुशंगाने नक्की माहिती मिळत नव्हती. दरम्यान हि चोरी उडतारे गावातीलच योगेश संदीप बाबर,
,या अट्टल गुन्हेगाराने केली असल्याची माहिती खास खबर्या
मार्फत सपोनि गर्जे यांना मिळाली व त्यास तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश पथकाला दिले . त्याप्रमाणे त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने हि चोरी केल्याचे
कबूल केले .
चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने आरोपीचा मामा रमेश दिनकर दुदुस्कर, वय - ४० वर्षे, रा. सोनगाव
ता.जावली, जि.सातारा याचेकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगीतले.त्या प्रमाणे त्याच्या मामाला या चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेवुन सह आरोपी
करुन त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने मुख्य आरोपी असलेला योगेश बाबरने दागिने विक्रीसाठी माझ्या कडे दिले असल्याची कबुली दिली .
आरोपी कडुन भुईंज पोलीस ठाणे हद्दीत आणखी एक घर फोडी करुन चोरी केल्याचे उघडकीस आले आहे
तसेच भुईंज पो स्टे २ , वाई पो स्टे १, शिरवळ पो स्टे १ असे मोटर
सायकल चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आणण्यास पथकाला यशआले आहे
गुन्हयातील अटक आरोपींकडे आणखी सखोल तपास केला असता त्यांनी मेढा आणी सातारा
तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मोटारसायकल चोरी करणा-या इतर आरोपीं बाबत माहिती दिल्याने
२ संशयीत आरोपींनाही ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी सातारा तालुका पो स्टेशन हद्दीतील - २ व मेढा पोलिस स्टेशन
हद्दीतून २ दुचाकी चोरल्याची कबुली दिल्याने त्यांच्या कडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत .
असा एकूण सहा लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल भुईंज पोलिसांनी जप्त केल्याने नागरिकांनी सपोनि रमेश गर्जे यांच्या सह अधिकारी आणी पोलिस पथकाचे अभिनंदन केले आहे .
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली,