कर्मवीर भाऊराव पाटील.. अबब महाराष्ट्राला केवढा मोठा लोकनेता सभेनं दिला..! अण्णांच्या स्मृतीस सभेचे अभिवादन..!!

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कर्मवीर भाऊराव पाटील.. अबब महाराष्ट्राला केवढा मोठा लोकनेता सभेनं दिला..! अण्णांच्या स्मृतीस सभेचे अभिवादन..!!





कर्मवीर भाऊराव पाटील.. अबब महाराष्ट्राला केवढा मोठा लोकनेता सभेनं दिला..! अण्णांच्या स्मृतीस सभेचे अभिवादन..
=

"कर्मवीरांनी जेवढे लोकांना शिकवून शहाणे केले आहे, जेवढे विद्यार्थी घडविले आहेत, तेवढे विद्यार्थी जगात कोणीच निर्माण केले नाहीत." हे उद्गार आहेत फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या पत्नी प्रिसिला चान यांचे. त्या जगातील दहा शिक्षण तज्ञांपैकी एक आहेत. मुलगी झाल्यावर जगातील मुलींच्या शिक्षणासाठी पैसे दान करताना त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले होते. भुतानचे राजे वांगचुक, रशियाचे पंतप्रधान मार्शल बुल्गाविन, बुकर टी वाशिंग्टन इ. जागतिक नेत्यांनी अण्णांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. असे हे आपले अण्णा दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष होते. सभेचे शिल्पकार स्व. आण्णासाहेब लठ्ठे यांच्या कार्याची उज्ज्वल परंपरा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी टिकवली व वाढवली. अण्णांच्या नेतृत्वाला पैलू पाडायचे ऐतिहासिक काम कोल्हापूर जैन बोर्डिंगच्या माध्यमातून दक्षिण भारत जैन सभेने केले.सुट्टीच्या दिवसात कोल्हापूर जैन बोर्डिंगसाठी धान्य व द्रव्यफंड जमवण्यासाठी भाऊराव खेडोपाडी जात.. लोकांना शिक्षणाचे महत्त्व सांगून फंड संग्रह करीत.. यामुळे त्यांना सार्वजनिक कामाचा अनुभव आला आणि त्यांच्या ठायी नेतृत्व विकसित झाले. ही सभेची देणगी आहे. 

कर्मवीर भाऊराव पाटील हे १९४४ मध्ये सांगली येथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.ते सभेच्या कामात हिरीरीने भाग घेत.. मार्गदर्शन करीत. अबब.. केवढा मोठा लोकनेता सभेनं महाराष्ट्राला दिला..!

आज सभेनं कर्मवीर भाऊराव पाटील यांना ६४ व्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन केलं.. यावेळी आण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील साहेब, चेअरमन रावसाहेब पाटील अण्णा, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, ट्रस्टी शांतीनाथ नंदगावे, महामंत्री प्रा. एन.डी.बिरनाळे, पदवीधर संघटनेचे चेअरमन प्रा. ए. ए. मुडलगी, दत्ताजी नलावडे, कळंत्रे अक्का जैन श्राविकाश्रमाच्या व्हा. चेअरमन सुनिता चौगुले, सेक्रेटरी  छाया कुंभोजकर, जाँईट सेक्रेटरी मंगल चव्हाण व सभेचा स्टाफ उपस्थित होता.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.