वाई : धक्कादायक ! ३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या : सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

वाई : धक्कादायक ! ३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या : सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह...




लोकसंदेश न्यूज सातारा
 दौलतराव पिसाळ

वाई : धक्कादायक ! ३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या : सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह


वाईतील गॅलक्सी माेबाईल शाेरुम मधील कर्मचाऱ्यान राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी समीर रशीद बागवान वय वर्ष ४८ यांनी वाई पोलीसात तक्रार दिली आहे याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की सिकंदर अमीन अतार वय वर्ष ३० मुळ रा औंध ता खटाव सध्या रा. मधली आळी सिद्धिविनायक अपार्टमेंट वाई याने राहत्या घरातच दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेत आपली जीवन यात्रा संपवली. सिकंदर शेख हा गॅलक्सी माेबाईल शाेरुम मध्ये नोकरीला होता. ताे दि. १६ मे पासूनच गायब होता. तसेच त्याने आत्महत्या करणार असल्याच बऱ्याच जणांकडे माेबाईल व्दारे सांगितल्याचे घटणास्थळावरील प्रत्यक्षदर्शींकडून बोललं जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून आत गेल्यानंतर मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनेची नोंद पोलीसात झाली असून आत्महत्येच कारण मात्र कळू शकलं नाही. घटनेचा पुढील तपास ए.पी.आय. आशिष कांबळे करत आहेत.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई .