वाई प्रतिनिधी-ओंकार पोतदार
सातारा:वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी 50 अर्ज दाखल.
दि. 25 – येथील दि वाई अर्बन को. आँप बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक पदाच्या 15 जागांसाठी गुरूवारअखेर 50 अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाबळेश्वरचे सहाय्यक निबंधक जनार्दन शिंदे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया दि. २२ मे पासून सुरू झाली असून शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. बँकेच्या संचालक पदाच्या 15 जागांमध्ये सर्वसाधारण गटासाठी 10, महिलांसाठी दोन, अनुसुचित जाती-जमातीसाठी एक, वि. जा., भटक्या जमाती व विशेष मागास वर्गासाठी एक तसेच इतर मागास वर्गासाठी एक अशी वर्गवारी आहे. गेल्या चार दिवसांत 50 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
दाखल झालेल्या उमेदवारांमध्ये विद्यमान अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे, उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, संचालक मदनलाल ओसवाल, अँड. प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, डाँ. शेखर कांबळे, अनिल देव यांचा समावेश आहे. तर माजी उपाध्यक्ष सुनील शिंदे, विवेक पटवर्धन, माजी संचालक माधव कान्हेरे, काशीनाथ शेलार,
सचिन गांधी, प्रशांत नागपूरकर, रमेश ओसवाल, दत्तात्रय मर्ढेकर, नंदकुमार ढगे, बाळकृष्ण पंडीत, मकरंद एरंडे, अशोक लोखंडे, स्वप्नील भिलारे, अनिल सावंत, पराग खोपडे, स्वप्नील जाधव, प्रवीण जगताप, यशवंत जमदाडे, दिलीप जमदाडे, मकरंद मुळ्ये, रवींद्र मेंहदळे, यशवंत लेले, प्रदिप चोरगे, अविनाश मेढेकर, अनिल शेंडे, राखीव प्रवर्गातून सुधाकर वाईकर, अविनाश फरांदे, चंद्रशेखर ढवण, अतुल वाईकर, प्रीतम भूतकर, चंद्रकांत गुजर, राजू खरात, गणेश जाधव आदींनी अर्ज दाखल केले आहेत. तर महिला प्रवर्गातून अनुजा पटवर्धन, ज्योती गांधी, सुनीति गोवित्रीकर, सरिता जमदाडे, धनश्री ननावरे यांनी अर्ज दाखल केले आहे.
शुक्रवार, दि. 26 मे रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दि. 29 मे रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी दि. 13 जून पर्यंत मुदत आहे. दि. 14 जून रोजी चिन्ह वाटप होणार आहे. आवश्यकता वाटल्यास दि. 25 जून रोजी मतदान घेण्यात येणार असून दि. 27 जूनला निकाल जाहीर करण्यात येणार आहेत, असेही निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन शिंदे यांनी सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई