जळगांव:पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूल चा 100% टक्के निकाल..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जळगांव:पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूल चा 100% टक्के निकाल..




जळगांव:पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूल चा 100% टक्के निकाल

लोकसंदेश जळगांव जिल्हा प्रतिनिधी शेख जावीद 

 पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कूल (CBSE) चा इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल लागला असून युग भगीरथ जयस्वाल याने 96:2% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांनी सलग चौथ्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखणाऱ्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्थेच्या शिंदे इंटरनॅशनल स्कूल (सी बी एस इ पॅटर्न) मधील एकूण 52 विद्यार्थी यावर्षी केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून 52 पैकी 17 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत घवघवीत यश संपादन केले आहे. शिंदे इंटरनॅशनल स्कूल मधील युग भगीरथ जयस्वाल (96:2%) याने पहिला क्रमांक, गौरव संदीप सोनवणे (95:4%) यांनी दुसरा, प्रितेश महेश देशमुख (95:8%)- आणि हर्ष सुबोध कांतायन (95:8%) या दोघांनी संयुक्तपणे तिसरा , मोहित प्रवीण लोढा याने चौथा (91%) तर प्रतीक भगवान पाटील (90:6%) याने पाचवा क्रमांक पटकावला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. विजय पाटील, इयत्ता दहावी (अ) च्या वर्गशिक्षिका श्वेता शिरुडे, दहावी (ब) चे वर्गशिक्षक सुधीर सूर्यवंशी, तसेच विषय शिक्षक सुधीर गोडसे, चंद्रकांत परदेशी, रक्षंदा चौधरी, विजेता शर्मा, नारायण कुंभार यासह जेष्ठ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे व संचालक मंडळाने शालेय गुणवत्तेसह, 100 % निकालाची परंपरा कायम राखणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे, आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.