लोकसंदेश न्यूज समाचारपत्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विशेषांक प्रसारित ... नागरिकांच्या कडून अंकाचे कौतुक व प्रशंसा...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

लोकसंदेश न्यूज समाचारपत्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विशेषांक प्रसारित ... नागरिकांच्या कडून अंकाचे कौतुक व प्रशंसा...




अहमदनगर

लोकसंदेश न्यूज समाचारपत्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विशेषांक प्रसारित .. नागरिकांच्या कडून अंकाचे कौतुक व प्रशंसा...


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लोकसंदेश न्यूज समाचार कडून डॉ.बाबासाहेबांची माहिती पर कलर विशेषांक प्रसारित केला होता. . या कलर विशेष अंकाचे प्रकाशन व वाटप लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड , शाखा अहमदनगर जिल्हा ऑफिस मधून करण्यात आले...


लोकसंदेश न्यूज समाचारपत्र व चॅनलने अहमदनगर जिल्ह्यातील या पाच वर्षात चांगल्या पद्धतीने बातम्या व विषय मांडल्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना एक चांगलं वाचन माध्यम, व व्यासपीठ निर्माण झाल असल्याचा आणि ज्ञानात भर पडल्याचे विचार या कार्यक्रमाचे वेळी नागरिकांनी आपलं मनोगत मध्ये व्यक्त केल.



लोकसंदेश न्यूजची अशीच वाटचाल दिवसे दिवस वाढत असून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये लोकसंदेश सर्वदूर पसरलेला आहे...


अहमदनगर मधून कार्यक्रमात बोलताना अहमदनगर जिल्हा संपादक : सलीम पठाण व सहसंपादक संजय कदम म्हणाले की, लोकसंदेश मुळे येथील प्रशासनावर एक चांगलाच दबाव निर्माण झाल्याचे ही त्यांनी सांगितले... लोकसंदेशच्या या कार्यक्रमाच्या वेळी नागरिकांनी लोकसंदेशला आपल्या शुभेच्छा दिल्या....


यावेळी लोकसंदेश न्यूज समाचार अहमदनगर ,जिल्हा संपादक ;सलीम पठाण व कार्यकारी संपादक संजय कदम आणि जाहीर शेख यांनी या अंकाचे प्रसारण व वाटप केले ...यावेळी बहुजन वंचित आघाडीचे सर्व पदाधिकारी , समाचार पत्राचे सदस्य व संचालक,अहमदनगर शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी आणी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे प्रतिनिधी,परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.