लोकसंदेश न्यूज नेटवर्क
स्त्री शिक्षणाचे कार्य ही म. फुलेंची क्रांती : आमदार सुधीरदादा गाडगीळ
सांगली दिनांक ११ एप्रिल २०२३ :- महात्मा जोतिबा फुलेंची जयंती आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी म.फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. "पुरुषांप्रमाणे स्त्रीसुद्धा शिकली पाहिजे, हा विचार १५० वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी मांडला. सर्वसामान्य जनतेचा स्त्री शिक्षणाला विरोध होता. स्त्रीचे काम चूल आणि मुल एवढेच असले पाहिजे अशी समाजाची भूमिका होती. तरी देखील प्रवाहाच्या विरुद्ध जावून 'जे योग्य आहे. ते केलेच पाहिजे' अशी ठाम भूमिका म. फुलेंनी घेतली आणि पूज्य सावित्रीबाई यांच्या सहाय्याने त्यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरु केली. हि महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या दृष्टीने सामाजिक क्रांती ठरली. यासाठी सर्व भारतीयांनी म. फुलेंबद्दल कृतज्ञता बाळगली पाहिजे" असे विचार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मांडले. यावेळी अध्यक्ष स्थानी सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री मा. ना. श्री. सुरेश भाऊ खाडे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, संघटन सरचिटणीस मकरंद देशपांडे, ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिरजे, माजी नगरसेवक विठ्ठल खोत, माजी महापौर संगीता खोत, नगरसेवक राजेंद्र कुंभार, नगरसेविका सविता मदने, भालचंद्र साठे, अमर पडळकर, उदय मुळे, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष शहानवाज सौदागर, गणपती साळुंखे, प्रियानंद कांबळे, सरचिटणीस मोहन वाटवे, राजू मद्रासी, प्रीती काळे, माधुरी वसगडेकर, जिल्हा उपाध्यक्षा जयश्री कुरणे, प्रसाद व्हळकुंडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते...
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.