कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र . छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर
मा. ना. सुरेशभाऊ खाडे साहेब कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री सांगली जिल्हा यांचे प्रमुख उपस्थितीत..
मा. ना. मंगल प्रभात लोढा साहेब
मंत्री कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता
यांचे ऑनलाईन मार्गदर्शन
दि. 5 मे 2023 शुक्रवार
वेळ - सकाळी 9.30 ते 12.30
स्थळ - डेक्कन मॅन्युफ्चॅक्चरर असोसिएशन हाॅल आरटीओ कार्यालय शेजारी सांगली
दहावीची बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे 10 वी /12 वी नंतर काय करावे आणि दहावीनंतर कोणता अभ्यासक्रम करावा? अभ्यासादरम्यान हा एक टप्पा आहे ज्यामध्ये घेतलेल्या निर्णयाचा संपूर्ण जीवनावर परिणाम होतो.....यासाठीच....
१० वी / १२ वी / नंतर काय ?
नविन तंत्रज्ञान आधारीत प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी , विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया , कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, व्यक्तिमत्व विकास, भविष्यातील रोजगाराच्या संधी, इ. बाबत करियर संबंधी मार्गदर्शन....
सदर व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली आणि शासकीय आयटीआय सांगली मार्फत डेक्कन मॅन्युफॅक्चरर असोसिएशन ट्रस्ट आरटीओ ऑफिस जवळ दि. 5 मे रोजी 9.30 ते 12.30 या वेळेत घेणेत येणार आहे
..सदर कार्यक्रमासाठी मा. ना. सुरेशभाऊ खाडे साहेब कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा याची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थीत राहणार आहेत....तसेच मा. ज. बा. करीम, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली आणि सौ.एम.डी. जोशी मॅडम जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी ह्या ही उपस्थीत राहणार आहेत ...
तसेच मा. सचिन पाटील साहेब प्रसिध्द उद्योजक व चेअरमन वसंतदादा औद्योगीक वसाहत हे ही उपस्थीत राहणार आहेत
अशी माहीती मा. व्हि. बी. देशपांडे साहेब प्रचार्य सांगली मा. एम.एस. गुरव साहेब उपप्राचार्य सांगली आयटीआय यानी दिली आहे
तसेच संस्थेचे श्री. जी. एम.दंडगे सर गटनिदेशक सौ.ए. एम. सुतार मॅडम गटनिदेशक श्री .एस.के. गोसावी सर गटनिदेशक श्री. आर.व्ही. माळी सर श्री. शहाजी पाटील सर व सर्व प्रभारी गटनिदेशक व शिल्पनिदेशक उपस्थीत राहणार आहेत
सदर मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये,
प्रा . श्री. संदीप पाटील हे 10वी आणि 12वी नंतर करिअरच्या विकासाची पहिली पायरी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत
श्री. हर्षल पाटील हे INCUBATION CERNTRE च्या माध्यमातून देण्यात येणारे सहाय्य, लाभ व मार्गदर्शन तसेच नव उद्योजकांना STARTUP बाबत मार्गदर्शन करतील
श्री.ऋषिकेश जाधव हे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता बाबत मार्गदर्शन करतील
श्री.प्रवीण तानाजी बनकर हे नॅशनल करिअर सर्व्हिस (NCS) बाबत मार्गदर्शन करणार आहेत
निशा उमेश पाटील हे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत समुपदेशन करणार,आहे.....
तरी कार्यकमासाठी सर्व 10 वी / 12 वी परीक्षेत बसलेल्या व इतर विध्यार्थ्यानी लाभ घ्यावा असे मा. सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली आणि मा. प्राचार्य व्हि.बी. देशपांडे साहेब यानी आवाहन केले आहे
या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उमेश लोहार सर सो अंजली धानोकर मॅडम ह्या करणार आहेत
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली ..