लोकसंदेश प्रतिनिधी
कर्मवीर पतसंस्थेचे ९०० कोटी ठेवीसह २० कोटी नफयाचे उद्दीष्ठ पुर्ण : श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगलीस आर्थिक वर्ष २०२२- २०२३ मध्ये रु. ९०० कोटी ठेव उद्दीष्ट पुर्तीसह २० कोटी ३ लाखाचा ढोबळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी दिली.
संस्थेच्या मार्च २०२३ अखेर प्रगती दर्शक आकडेवारीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ढोबळ नफयातून ९ कोटीची रक्कम निरनिराळ्या निधीकडे वर्ग करण्यात आली. त्यामुळे संस्थेचा स्वनिधी भक्कम झाला आहे. संस्थेचे वसुल भागभांडवल ३० कोटी ४ लाख आहे. संस्थेचा स्वनिधी ८४ कोटी झाला आहे. आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीमध्ये २४२ कोटीची भरघोष वाढ होवुन संस्थेच्या ठेवी रु. ९०१ कोटी झाल्या आहेत. संस्थेने ६२१ कोटी चे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची गुंतवणुक ३६७ कोटी आहे. संस्थेचे खेळते भांडवल १०६५ कोटी असून संस्थेचा एकूण व्यवसाय १५२२ कोटी झाला आहे. तरतुदीनंतर संस्थेला रु. ११ कोटी इतका निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे सभासदांना चांगला लाभांश देता येईल. संस्थेचा निव्वळ एनपीए १.९० टक्के राहिला आहे. संस्थेची सभासद संख्या ५५५०० इतकी झाली आहे संस्थेचा प्रतिसेवक व्यवसाय ५ कोटी ६४ लाख आहे. संस्थेने सामाजिक कार्यासाठी तसेच चांगल्या सेवेसाठी तंत्रज्ञानावर भर देण्यासाठी नफ्यातून चांगली तरतुद केली असल्याचे त्यांनी सांगितले.
सभासदांच्या विश्वासावर संस्थेने अतिशय उत्तम प्रगती केल्याचा त्यांनी उल्लेख केला. व सर्व सभासद ठेवीदार, कर्जदार यांचे आभार व्यक्त केले. चेअरमन रावसाहेब पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे उत्तम नियोजन व सर्व संचालकांचे सहकार्य यामुळे संस्था चांगली प्रगती करीत असल्याचे मत संचालकांनी व्यक्त
केले. सर्व सेवकांनी संस्थेच्या प्रगतीमध्ये सांधिक योगदान दिल्यामुळे त्यांचे ही अभिनंदन
करण्यात आले.
यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे संचालक अँड एस.पी. मगदूम, डॉ. रमेश वसंतराव ढबू श्री. अं के चौगुले (नाना) श्री. वसंतराव धूळाप्पाण्णा नवले. डॉ. एस. बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आण्णासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे श्री. लालासो भाऊसो थोटे. कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्या सह संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.