पैशाचा मोह.. जेलची देईल हवा... कुपवाडच्या तलाठ्याला दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पैशाचा मोह.. जेलची देईल हवा... कुपवाडच्या तलाठ्याला दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले..




पैशाचा मोह.. जेलची देईल हवा...

कुपवाडच्या तलाठ्याला दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले..

आठवडाभरात होणार होता पोलीस अधिकारी ..लाचेचा मोह नडला..

सांगली : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून तो पोलिस उपनिरीक्षक झाला...पण महसूलच्या आकर्षणापोटी त्याने पुन्हा अभ्यास करून तलाठी झाला... अभ्यास करून इतर विभागातील अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्याने तो पुन्हा एकदा पोलिस दलात अधिकारी म्हणून सेवेत येणार होता. तोवरच दहा हजारांच्या लाचेच्या मोहाने तो ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अडकला.


कुपवाड येथे गुंठेवारीतील घरजागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करून देण्याच्या मोबदल्यात दहा हजारांची लाच स्विकारताना तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. सचिन प्रल्हाद इंगोले वय ३८, रा. कृष्णकुंज अपार्टमेंट, विजयनगर, सांगली असे संशयिताचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी कार्यालयातच सापळा लावून ही कारवाई केली.


      ( या तलाठी ऑफिस बाबत वारंवार सर्व संघटनांनी तक्रारी केलेल्या होत्या)

तक्रारदाराच्या मित्राचा अजिंक्यनगर, कुपवाड येथे गुंठेवारीमधील जागा आहे. त्यांनी अन्य एकाकडून ती खरेदी केली होती. यानंतर महापालिकेकडून या जागेचे गुंठेवारीचे प्रमाणपत्रही घेण्यात आले होते. मात्र, जागेच्या सातबारा उताऱ्यावर नावे लावण्यात आली नव्हते. यासाठी तक्रारदाराच्या मित्राने कुपवाड येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. या नोंदी जून्या असल्याने नोंदी घालण्यासाठी तलाठी इंगोले याने तक्रारदाराकडे दहा हजार रूपये लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. 


 शुक्रवारी तलाठी कार्यालयात सापळा लावण्यात आला. यावेळी १० हजार रूपयांची लाच स्विकारताना इंगोले यास रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. लाचलुचपतचे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, ऋषीकेश बडणीकर, अजित पाटील, चंद्रकांत जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

तलाठी इंगोले हा पूर्वी पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात कार्यरत होता असे समजते. मात्र, नंतर अभ्यास करून परिक्षा देत त्याने महसूल विभागात तलाठी म्हणून नियुक्ती घेतली होती. यानंतर पदोन्नती आल्याने त्याने पुन्हा एकदा सरकारकडे पोलिस दलात काम करण्याची विनंती केली हाेती. शासनानेही ती मान्य केली हाेती. दहाच दिवसात तो पोलिस दलातील सेवेत दाखल होणार होता. तोवरच दहा हजारांची लाच घेताना तो ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अडकला.
_________________________________

संपादकीय...

महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट एक नंबरचे खाते म्हणून गणले जाणारे महसूल खाते.. साधा सात बारा देखील घ्यायचा असेल तर पन्नास रुपयाची मागणी केली जाते .... या  भ्रष्टाचारी कुत्र्याना आवरणारा कोणताही उच्च पदस्थ अधिकारी आज तरी सांगलीत दिसत नाही... उपलब्ध नाही...

आम्हास असे कळते की, वरपर्यंत याचा "मलिदा" जात असतो त्यामुळे उच्च अधिकारी सुद्धा याला पाठीशी घालत असतात महसूल खात्याचे उच्च अधिकारी आहेत हे सांगली जिल्ह्याचे प्रमुख म्हणून घेतात ते सुद्धा यात सामील असल्याचे दिसून येत आहे.. यांच्या ऑफिस मधूनच एजंटांचा सुळसुळाट सुरू असतो  ..परंतु यांनी पद्धतशीरपणे डोळे झाक करून  या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी लोकांच्या कामात "मलिदा"कसा मिळेल या वरच लक्ष केंद्रित केलेल आहे... खरं म्हणजे या लोकांना केबिन सिस्टीम दिल्यामुळे ह्या भ्रष्टाचाराला  वारंवार वाव मिळत आहे..

सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकारीच्या केबिन व्यतिरिक्त येथील इतर अधिकाऱ्यांना केबिन दिल्यामुळे यांच्याशी जनसंपर्क तुटला आहे व जनसामान्यात मिसळण्याच्या या अधिकाऱ्यांची मानसिकता नाही... त्यामुळे हे अधिकारी मग ते पुरुष  अथवा महिला असोत स्वतःला राजे समजतात... ज्या जनतेच्या पैशाच्या टॅक्स मधून हे पगार घेतात त्या जनतेला "कसपटाप्रमाणे'' वागणूक देण्याचे काम हे आधिकारी करत असतात आणि याचा प्रत्यय  सर्व नागरिकांना आलेला आहे व येत आहे 
या सर्वांचे केबिन काढून घ्यावेत व त्यांना जनरल ऑफिसमध्ये बसउन लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचे, लोकांच्या पर्यंत काय अडचणी आहेत ,जनता किती हलपाटी मारते, याच्यावर लक्ष देण्याचे प्रशिक्षण परत एक वेळा जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत.

या सर्व महत्त्वाच्या ऑफिसमध्ये सीसीटीव्हीची यंत्रणा बसवण्यात यावी, म्हणजे आपल्या ऑफिस मधून या ऑफिसवर आपल्याला लक्ष देता येईल...

 ..अन्यथा  या "मलिदा" मध्ये या सर्वांचा हिस्सा आहे असा एक मेसेज सांगलीकरांना जाईल...

आज पर्यंत कुठल्याही जिल्हाधिकाऱ्याने आपल्या एवढ्या तक्रारी झाल्या... परंतु एखाद्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला स्वतः "स्ट्रिंग" करून निलंबित केल्याचं प्रकरण या सांगलीत तरी आम्हाला दिसलं नाही... अर्थात सगळेच "तुकाराम मुंढे" नसतात असो...

        जिल्हाधिकारी साहेब थोडे लक्ष द्या...

 सांगलीकरांची दैना होत आहे  आणि या भ्रष्टाचाराला संपवण्यासाठी आपला त्यात महत्त्वाचा रोल असावा... या भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी तुम्हीच पावले उचलणे गरजेचे असल्याचे जनतेतून बोललं जात आहे .

                  विशेष टीप:

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घेणारे मंत्री सुरेशभाऊ खाडे यांचं कार्यालय ही जिल्हाधिकारी कार्यालयातच आहे ..यांनी सर्व उच्च व सर्व अधिकाऱ्यांना या भ्रष्टाचाराबाबत सक्त आदेश द्यावेत .. पालकमंत्री म्हणून आपण या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत.....सांगलीकर आपल्या आदेशाची वाट पाहत आहेत.....

 आपला :संपादक ;; लोकसंदेश न्यूज मीडिया सांगली 
8830247886