सुधीरदादा माझा नवरा आज तुमच्यामुळे जिवंत आहे... गणरायाच्या रुपात तुम्हीच मदतीला धावून आलात...!
सुधीरदादा माझा नवरा आज तुमच्यामुळे जिवंत आहे गणरायाच्या रुपात तुम्हीच मदतीला धावून आलात
सांगली विधानसभेचे विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना जनतेने कार्यसम्राट ही पदवी बहाल केलेली आहे याची कार्यप्रचिती या गेल्या आठ वर्षांमध्ये अनेक कामाच्या रूपात दादांची मदत आम्ही सर्वांनी पाहिली आहे.
'रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा'
'सेवा परमो धर्म' याच संकल्पनेच्या प्रेरणेतून दादा आपल्या जनतेसाठी कार्य करताना दिसतात.
मी नेहमीप्रमाणे सकाळी ११.४५ वा. दादांच्या दालनात उपस्थित होतो दैनंदिन कामकाजामध्ये दादा व्यस्त होते तेवढ्यात एक महिला दालनामध्ये आल्या त्या दादांच्या समोर अक्षरशः जोरात रडायला लागल्या आणि दादा मी तुमच्यासमोर हात जोडते माझ्या नवऱ्याला फक्त तुम्हीच वाचवू शकाल दालनामध्ये उपस्थित आम्ही दोघेही गहिवरलो सगळ्यांचे डोळे पानावले दादांनी त्यांना शांत केले तुम्ही आधी बसा आणि मला नेमकं काय झाले त्याची पूर्ण माहिती द्या.
माझे नाव कल्पना खोत माझे माहेर औरंगाबाद आहे व सासर कवठेमंकाळ आहे सद्या सांगलीमध्ये राहते माझे मिस्टर काही दिवस सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेत होते परंतु त्या ठिकाणी उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यामुळे मिरज येथील डॉक्टर पृथ्वीराज मेथे यांच्याशी चर्चा करून उषःकाल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे गेली १० दिवस त्याठिकाणी उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे मी आपल्याकडे मदतीच्या आशेने आले आहे मला आपणाकडून मदत हवी आहे मी वैयक्तिकरित्या थोडीफार रक्कम जमा करून हॉस्पिटलमध्ये भरली आहे सर्व नातेवाईकांनी साथ सोडली आहे शेवटची आशा म्हणून मी आपल्याकडे आली आहे माझ्या परिवाराने तर सांगितले की आपण आता यांना घरी घेऊन जाऊया खर्च करून काही फायदा होणार नाही तुम्हीच आहात दादा मला मदत करणारे या सर्व भावनांना खोत ताईनी वाट मोकळी करून दिली.
दादांनी सर्व माहिती घेताच क्षणाचा ही विलंब न करता मिरज येथील ब्रीदवेल हॉस्पिटलचे डॉ.पृथ्वीराज मेथे यांना तात्काळ फोनवर संपर्क साधला रुग्णाची संपूर्ण माहिती घेतली त्यावेळी डॉक्टर मेथे यांनी सांगितले की संबंधित रुग्णाचे फुप्फुस ८०% इन्फेक्टेड आहे फक्त २० % काम करत आहे रुग्णाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे ते गेल्या १५ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहे परंतु आम्ही सर्व प्रयत्न व उपचार करत आहोत तसेच उषःकाल हॉस्पिटलचे डॉक्टर परीख यांच्याशी ही दूरध्वनीवरून संपर्क साधला त्यांना तात्काळ सांगितले की या सर्व उपचारासाठी जी काय मदत लागेल ती मी सर्वतोपरी करेल त्यावर दादांनी डॉक्टरांना आश्वस्थ केले की खोत परिवाराची आर्थिक स्थिती विकट आहे पैशासाठी कोणतेही उपचार थांबता कामा नये व तुम्ही चिंता करू नये तुमच्याकडून पूर्ण प्रयत्न व उपचार सुरूच ठेवा शेवटी जे काय असेल ते सर्व परमेश्वराच्या हाती आहे.
तोच खोत ताईंना दादांनी हॉस्पिटल कडे जाण्यास सांगितले.उपचार सुरू झाले मध्यावधीमध्ये दोन वेळा दादांनी स्वतः समक्ष जाऊन श्री.कैलास खोत यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. खोत यांच्यावर उषःकाल हॉस्पिटलमध्ये तब्बल ३५ दिवस उपचार सुरू होते या उपचाराकरिता जवळपास ४ लाख २० हजार रुपये लागणार सर्व खर्च दादांनी मदतीचा स्वरूपात केला.या सर्व उपचारामध्ये मिरज येथील ब्रीदवेल हॉस्पिटलचे डॉक्टर पृथ्वीराज मेथे तसेच उष:काल हॉस्पिटलचे डॉक्टर परीख यांनी देखील खूप सहकार्य केले व योग्य उपचार केले.
याचाच प्रत्येय म्हणजेच ईश्वराने एका हाताने दिले तुम्ही दुसऱ्या हाताने पुढे द्या मदत करा व मदत जो योग्य पद्धतीने करतो तोच खरा आरोग्यदूत म्हणावतो.
काल अक्षय तृतीयेचा सण होता सुधीरदादा सायंकाळी दालनात नेहमी प्रमाणे उपस्थित होते तेवढ्यातच खोत दांपत्यांचा फोन आला दादा आम्ही आपणास भेटायला येतोय ते सर्व कुटुंब आले दोघांनी जोडीने तसेच आपल्या परिवारासोबत नमस्कार घातला आणि पायाला स्पर्श केला आशीर्वाद घेतला आणि पुन्हा दोघांनी डोळ्यातून अश्रू काढले श्री.खोत म्हणाले दादा आज मी आपल्या समोर उभा आहे तो फक्त आपल्यामुळे...!
दादांनी खोत कुटुंबीयांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देत असेच निरोगी आयुष्य तुम्हास लाभो असे उद्गार संबोधले.....
दादा एकच मन आहे आमच्याकडे ....किती वेळा जिंकणार.... हेच मला नेहमी लिहावयास लागत आहे.....
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली