रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धम्मचक्र कला क्रीडा संस्कृती युवा मंच सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती मोठ्या उत्साहात साजरी....
सांगली: विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती महात्मा फुले चौक राजर्षी शाहू कॉलनी (नवीन वसाहत) सांगली येथे मोठ्या उत्साहात करण्यात आली
यावेळी सांगली विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव तथा नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कमान ते महात्मा फुले चौक या महामार्गावर मोठ्या प्रमाणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आमदार सुधीर दादा गाडगीळ म्हणाले विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्मांना संविधान लिहूनएकत्र ठेवण्याचे काम केले आहे बाबासाहेबांचा दिलेला मूलमंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा युवकाने या विचाराने चालावे असे प्रतिपादन केले. रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव तथा नगरसेवक जगन्नाथ दादा ठोकळे म्हणाले शोषित पीडित दलित बहुजन समाजाला नवी दिशा देण्याचं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे त्यांचे भारत देशावर फार मोठे उपकार आहेत आणि ते उपकार विसरून चालणार नाही या कार्यक्रमाचे अध्यक्ष संयोजक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष तथा धम्मचक्र युवा मंच कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ संस्थापक अध्यक्ष अरुणभाऊ आठवले यांनी केले.आप्पासाहेब कांबळे सुनील कांबळे सर्जेराव कांबळे अक्षय साबळे सिद्राम कांबळे अमोलजी कणसे युवराज साबळे आणि पदाधिकारी यांच्या उपस्थित कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.