SANGLI:
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी.
आर.टी ओ.'ची धडक मोहीम ...अल्पवयीन मुलांची १२ वाहने जप्त.... ही कारवाई अशीच निरंतर चालू राहणार... सांगली आर.टी.ओ...
२० अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई
शहरात अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालविण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे अपघाताच्याही घटना वाढल्या आहेत. यावर आळा घालण्यासाठी दिनांक 3 मार्च रोजी आरटीओच्यावतीने धडक मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार एकाच दिवसात २० अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करत १२ वाहने जप्त करण्यात आली.
मोटार वाहन कायद्यानुसार १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना वाहन देऊ नये, अशा सूचना असतानाही अनेक मुले शहरात फिरताना आढळतात त्यामुळे आर.टी.ओ.मार्फत शाळा, महाविद्यालयात जाऊन प्रबोधनही करण्यात आले होते. तरीही असे प्रकार सुरू असल्याने आता थेट कारवाई करण्यात आली. आरटीओच्या 'वायुर्वेग' पथकाने शहरात ही कारवाई केली. यात अल्पवयीन वाहनचालकांच्या पालकांवर कारवाई करण्यात आली
दहा हजारांचा मोठा दंड...
आर टी.ओ.नी केलेल्या कारवाईत परवाना नसताना वाहन चालविल्याबद्दल ५ हजार रुपये दंड ,वाहन मालकास ५ हजार असा १० हजार.रकमेचा दंड असल्याने अल्पवयीन वाहनचालकांचे व पालकांना चांगलाच दणका बसला आहे.
सोळा वर्षावरील मुलांनी कोणतेही वाहन चालवल्यास पालकास तीन वर्ष कारावास व २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे तर शिवाय त्या मुलास २५ वर्षापर्यंत वाहन परवाना मिळत नाही , वाहनाची रजिस्ट्रेशन ही रद्द होते,
यापुढे ही अशीच कारवाई सुरु राहणार असून पालकांनी व त्यांच्या अल्पवयीन मुलानी असा बेकायदेशीर वाहन चालवण्याचा प्रकार करू नये..
असे आवाहन सांगली आर.टी.ओ. कडून करण्यात येत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.
________________________________________________
संपादकीय ,
आर.टी.ओ ऑफिसने अल्पवयीन मुलांच्यावर वाहन चालवण्याविषयी जी कारवाई सुरू केली आहे ती सर्व पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे..
आम्ही सर्व पालकांना सुचित करू इच्छितो की, आपण आपल्या अल्पवयीन मुलांना कोणतीही गाडी चालवण्यासाठी देऊ नये त्यामुळे आपणास व आपल्या मुलास दंडासह गाडीचे रजिस्ट्रेशन कॅन्सल पर्यंत कारवाईस सामोरे जावे लागणार आहे
खरं पाहायला गेलं तर ...आजच्या या युगात गाडीची गरज आहे परंतु आरटीओ नियमाप्रमाणे 18 ते 20 वर्षाच्या नंतरच गाडी चालवणे योग्य असल्याने त्या मुलामध्ये समज आल्यानंतरच त्यास गाडी देण्याची व्यवस्था पालकांनी करावी ....अन्यथा "देव न करो" अशी काही दुर्घटना घडली तर... पालकांना आयुष्यभर दुःख करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही .. तरी सर्व पालकांनी गांभीर्याने या गोष्टीचा विचार करावा व आपल्या मुलांच्या हातात आपलं वाहन द्यावे मग ते टू व्हीलर असो फोर व्हीलर असो अथवा कोणतेही वाहन. त्याला जोपर्यंत समज येत नाही.. व जोपर्यंत कायदे प्रमाणे त्याचे वय होत नाही . त्याला व्यवस्थित गाडी चालवण्या चालवता येई पर्यंत सर्व नियमाची समाज आल्यानंतरच त्याच्या हातात गाडी द्यावी
तोपर्यंत हि चूक पालकांनी करून नये ...अन्यथा समोर दंडास तर सामोरे जावे लागेलच.. परंतु आपणास आपल्या पूर्ण जीवनात ही सल सतावत राहील ...असो
... यावर आपण सर्व पालकांनी गांभीर्यांने विचार करावा...
ही विनंती...
सलीम नदाफ, संपादक :लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /सांगली.
8830247886