हरिपूर-कोथळी पूल एप्रिलमध्ये होणार खुला : आमदार सुधीर गाडगीळ
सांगली : हरिपूर कोथळी पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून एप्रिलपर्यंत हा पूल कार्यान्वित होऊन नागरिकांसाठी वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी स्पष्ट केले. आयर्विनला समांतर पूल उभारणीचे काम गतिमान पद्धतीने सुरू आहे. त्यांनी या पुलांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी दोन्ही कामाची सखोल माहिती घेतली.
पुलाच काम 95 टक्के पूर्ण झाले असून भरावाचे व भूसंपादनाचे काम अत्यंत टप्प्यात आहे सदर पुलाचे काम पूर्ण होऊन मे महिनामध्ये नागरिकांसाठी व वाहतुकीसाठी खुला करता येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर यांनी दिली.
यावेळी अरविंद तांबवेकर, माजी सरपंच विकास हणबर, महेश हणबर, गणपती साळुंखे, युवराज बोंद्रे, सतीश खंडागळे, नगरसेवक सुबरावतात्या मद्रासी, मल्हारी तांदळे, संभाजी सूर्यवंशी, नरसु खोकडे, रामचंद्र पवार, अरविंद खंडागळे, शंकरराव बोंद्रे, परशु जाधव, गणपती हणभर, संपत चौधरी, पंडित बावधनकर, आनंदराव भोई, गणपती देसाई, बाळू तांबवेकर कृष्णा देशपांडे, संतोष केस्तीकर, प्रकाश तांबेकर, विक्रम तांबवेकर, राजाराम आळवेक, सहा.कार्यकारी अभियंता अमर नलावडे, शाखा अभियंता अभय क्षीरसागर तसेच मनुजा स्थापत्यचे बाजीराव मुसळे आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
तसेच सांगली आयर्विन पुलाजवळील समांतर पुलाची आज पाहणी केली समांतर पुलाची काम युद्ध पातळीवर सुरू असून तीन महिन्यात हा नागरिकांच्या सेवेसाठी लोकार्पण करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर यांनी माहिती दिली यावेळी सहा कार्यकारी अभियंता अमर नलावडे, शाखा अभियंता अभय क्षीरसागर, नगरसेवक युवराज बावडेकर, सुबराव तात्या मद्रासी, गणपती साळुखे तसेच मनुजा स्थापत्यचे बाजीराव मुसळे आदी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.