RATNAGIRI: देवळे मंडळ अधिकारी उल्हास मुरुडकर यांला २५ हजारांची लाच घेताना ए.सी बी. ने पकडले रंगेहाथ.....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

RATNAGIRI: देवळे मंडळ अधिकारी उल्हास मुरुडकर यांला २५ हजारांची लाच घेताना ए.सी बी. ने पकडले रंगेहाथ.....




लोकसंदेश प्रतिनिधी रत्नागिरी

RATNAGIRI: देवळे मंडळ अधिकारी उल्हास मुरुडकर यांला २५ हजारांची लाच घेताना ए.सी बी. ने पकडले रंगेहाथ.....

कानाकडी सजाचे तलाठी संतोष मोघे यांला ही  घेतले ताब्यात...

रत्नागिरी, प्रतिनिधी : तक्रारदार यांच्या वडिलोपार्जित शेतजमीन मिळकतीवर तक्रारदार यांचे सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करून ते मंजुरीसाठी पाठविण्याकरिता २५ हजार रुपयांची लाच मागितली होती आणि २५ हजार लाच स्वीकारताना देवळे (संगमेश्वर) येथील मंडळ अधिकारी उल्हास विश्वनाथ मुरुडकर, याला आज २९ मार्च २०२३ रोजी  लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीकडून रंगेहाथ जेरबंद करण्यात आले. व दुसरा आरोपी संतोष महादेव मोघे, तलाठी सजा कानाकडी, ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी यांनी तक्रारदार यांच्या कडे २८ फेब्रुवारी २०२३ रोजी मोबाईल फोनची मागणी केली होती. या दोघांनाही लाचलूचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी युनिटने ताब्यात घेतले असून त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. 


या कारवाई करणाऱ्या सापळा पथकात पोलीस निरीक्षक प्रवीण ताटे, पोलीस हवालदार संतोष कोळेकर, पोलीस नाईक दीपक आंबेकर, पोलीस शिपाई हेमंत पवार, पोलीस शिपाई. राजेश गावकर, चालक पोलीस नाईक प्रशांत कांबळे यांनी सहभाग घेतला. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून
श्री. सुशांत चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वी. रत्नागिरी यांनी काम पाहिले आणि कारवाईसाठी श्री. सुनिल लोखंडे, पोलिस अधीक्षक, ला.प्र. वि. ठाणे परिक्षेत्र यांनी मार्गदर्शन लाभले.

           नागरिकांना महत्त्वाची सूचना..

आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील फोन व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन रत्नागिरी जिल्यातील सर्व नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कडून करण्यात आले आहे. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
संपर्क :-
१)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
रत्नागिरी कार्यालय फोन नं. 02352- 222893
२) *श्री सुशांत चव्हाण, DYSP , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी* मो.नं.9823233044
३) *श्री प्रविण ताटे, PI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी* मो. नं. 8055034343
4) *श्री अनंत कांबळे, PI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी* मो.न. 7507417072
३) टोल फ्री:- १०६४
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.