शहर जिल्हा काँग्रेस च्या वतीने भाजपा सरकारच्या दडपशाही विरोधात निषेध आंदोलन....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शहर जिल्हा काँग्रेस च्या वतीने भाजपा सरकारच्या दडपशाही विरोधात निषेध आंदोलन....



शहर जिल्हा काँग्रेस च्या वतीने भाजपा सरकारच्या दडपशाही विरोधात निषेध आंदोलन....

 
सांगली दि. २३ :

काँग्रेस खासदार राहुलजी गांधी यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत निरव मोदी, ललित मोदीसारख्या भ्रष्ट लोकांविषयी जी भूमिका मांडली ती देशहिताची होती. जनतेचे पैसे लूटून हे मोदी देशाबाहेर पळून गेले हे वास्तव आहे. राहुलजी गांधी यांच्यावर झालेल्या शिक्षेच्या कारवाई मागे बोलवता धनी कोण आहे आता सबंध देशाला माहित झाले आहे. हे षडयंत्र केंद्र सरकारच्या दबावाखाली रचण्यात आले आहे.   राहुलजी गांधी यांची पदयात्रा.. लोकांनी त्याला दिलेला पाठिंबा.. केंद्र सरकारविषयी सामान्य माणसाच्या मनात खदखदत असलेला असंतोष यामुळे पंतप्रधान मोदी घाबरलेले असून त्या भितीपोटीच त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, 
खा. राहुलजी गांधी यांच्यावर भाजपा सरकार आकसापोटी कारवाई करत असल्याच्या विरोधात सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाने सांगली काँग्रेस भवनासमोर जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा व शहर काँग्रेस, विविध सेल व काँग्रेस सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी बोलताना अजित ढोले,  म्हणाले की, जनतेचे पैसे घेऊन पळालेल्यांवर राहुलजी गांधी यांनी भूमिका घेतली तर त्यांच्यावर खोटे आरोप लावून दबावाखाली कारवाई करण्यात आली. दबावाखाली होत असलेल्या कारवाईचा काँग्रेसने निषेध केला आहे. ललित मोदी व निरव मोदी यांच्याबद्दल बोलल्यानंतर जर शिक्षा होत असेल तर काँग्रेस पक्ष राज्यभर जेल भरो आंदोलन करुन त्याचा निषेध करेल.
यावेळी बोलताना आशीष कोरी,  म्हणाले की, सावरकर यांच्याबद्ल काँग्रेसने आधीच भूमिका स्पष्ट केलेली आहे परंतु विरोधी पक्ष जाणीवपूर्वक राहुलजी गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे.
 केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या दबावतंत्राविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही म्हणून काँग्रेसने हे आंदोलन केले आहे.

राहूल गांधी यांच्यावर आकसाने व तेही गुजरातमधून कारवाई केली आहे. सुरत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष वरच्या न्यायालयात धाव घेईलच परंतु राहुलजी गांधी आक्रमक भूमिका घेत जनतेचे प्रश्न मांडत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता पराभवाची भिती वाटू लागली आहे. राज्यातील विधान परिषद व विधान सभा पोटनिवडणुकीतही त्याचा प्रत्यय आलेला आहेच. म्हणूनच पराभव दिसू लागल्याने निवडणुकीच्या तोंडावर अशा कारवाया सुरु आहेत. भाजपाच्या अशा कारवायांविरोधात काँग्रेसही चोख उत्तर देईल.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.