राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करणे, ही तर हुकूमशाहीच :: पृथ्वीराज पाटील

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करणे, ही तर हुकूमशाहीच :: पृथ्वीराज पाटील




राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करणे, ही तर हुकूमशाहीच
पृथ्वीराज पाटील

निर्णयाविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचे तीव्र आंदोलन


सांगली, दि. २४ :
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते श्री. राहुल गांधी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची लोकसभेतील सदस्यता हुकूमशाही पद्धतीने रद्द करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हे खूप मोठे षडयंत्र आहे. या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत आहोत, अशा शब्दात सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


श्री. राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द केल्यानंतर सांगलीत तीव्र प्रतिक्रिया उमटली. काँग्रेस भवनसमोर सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.



यावेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले, देशात पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याकडून अत्यंत घाणेरडे राजकारण चालू आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवला होता. उद्योजक गौतम अडाणी यांच्यावर हिंडनबर्ग कंपनीने अहवाल जाहीर केल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी आणि अडाणी यांच्या संबंधाबाबत त्यांना लोकसभेत धारेवर धरले होते, त्यामुळे राहुल गांधी यांना संसदेच्या अधिवेशनात बोलू दिले जात नव्हते. मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांचा राग मनात धरून सूड उगवण्यासाठी त्यांच्यावर एका खोट्या गुन्ह्याखाली दोन वर्षांची शिक्षा लावण्यात आली आहे. त्यानंतर २४ तासांच्या आतच त्यांचे लोकसभेतील सदस्यत्वही रद्द केलेले आहे.  

ते म्हणाले, अत्यंत हुकूमशाही पद्धतीने राहुल गांधी यांच्यावर ही कारवाई केलेली आहे. या निर्णयाच्या विरोधात देशातील जनता आपला रोष व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. लोक राहुल गांधी यांच्या पाठीशी आहेत, ते मोदी आणि त्यांचा भाजप हा पक्ष यांना धडा शिकवल्याशिवाय सोडणार नाहीत. मोदी अस्ताची ही सुरुवात आहे, असेही श्री. पाटील यांनी म्हंटले आहे.


यावळी विशाल पाटील म्हणाले, हा तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा डाव  आहे. यातूनही ते ताऊन सुलाखून पुन्हा उभा राहतील. सारा देश त्यांच्या पाठीशी आहे.

या आंदोलनात श्रीमती शैलजाभाभी पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, करीम मिस्त्री, नगरसेवक तोफिक शिकलगार, रवींद्र वळवडे, अभिजित भोसले, संजय कांबळे, प्रकाश मुळके,  मालन मोहिते, सनी धोतरे, महावीर पाटील, डी. डी. चौगुले, भाऊसाहेब पवार, धनराज सातपुते, अजित ढोले, आदिनाथ मगदूम, पी एल राजपूत, मौला वंटमोरे, अल्ताफ पेंढारी, कपिल कबाडगे, बाबगोंडा पाटील, नासिर चौगुले, वसीम रोहिले, अख्तर अत्तार, उत्तम सूर्यवंशी, देशभूषण पाटील, राजेंद्र कांबळे, अशीष चौधरी, बी एस पाटील, अजित भरमगुडे, चेतन पाटील, समीर मुजावर, नाना घोरपडे, आशिष कोरी, अमित बसतवडे, आबा जाधव, ॲड.भाऊसाहेब पवार, शितल सडलगे, सूर्यकांत लोंढे, बाळासाहेब पाटील, योगेश जाधव, सुकुमार कांबळे, अजय देशमुख, बाबागोडा पाटील, नामदेव चव्हाण, महेश शिंदे, प्रशंत देशमुख, सूर्यकांत लोंढे, गजानन तोडकर, प्रश्नांत अहिवले, महेश शिंदे, मनिष साळुंखे, भाऊसाहेब माळी, हणमंत साबळे,
हेही उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.