शिमगो इलो रे...होळी निमित्ताने मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी विशेष ट्रेन; जाणून घ्या वेळापत्रक...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शिमगो इलो रे...होळी निमित्ताने मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी विशेष ट्रेन; जाणून घ्या वेळापत्रक...




कोकणवासिया साठी लोकसंदेश चा स्पेशल रिपोर्ट

                   कोकण विशेष....

शिमगो इलो रे...होळी निमित्ताने मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी विशेष ट्रेन; जाणून घ्या वेळापत्रक



मुंबई:: होळी निमित्ताने गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी मध्ये रेल्वेकडून 12 अतिरिक्त होळी स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. होळी सणा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / पनवेल आणि सावंतवाडी रोड / रत्नागिरी दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत



1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - रत्नागिरी विशेष (3 सेवा)
01151 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 07.3.2023 रोजी रात्री 00.30 वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी 09.00 वाजता पोहोचणार आहे.
01152 विशेष रत्नागिरी येथून दि. 6.3.2023 रोजी 06.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी 13.50 वाजता पोहोचेल.
ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबणार आहे.



2. पनवेल - रत्नागिरी विशेष (4 सेवा)
01153 विशेष गाडी दि. 5.3.2023 आणि 8.3.2023 रोजी पनवेल येथून 18.20 वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी 00.20 वाजता पोहोचेल. 
01154 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. 4.3.2023 आणि 7.3.2023 रोजी सकाळी 10.00 वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी 16.20 वाजता पोहोचेल. 
ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबणार आहेत. 



3. पनवेल - सावंतवाडी रोड विशेष (4 सेवा)
01155 विशेष गाडी पनवेल येथून दि. 4.3.2023 आणि 7.3.2023 रोजी 18.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.10 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
01156 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दि. 5.3.2023 आणि 8.3.2023 रोजी 07.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 17.20 वाजता पनवेल येथे पोहोचेल. 
ही विशेष ट्रेन रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे.



 4. रत्नागिरी- लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे विशेष
01158 स्पेशल रत्नागिरी येथून 9.3.2023 रोजी 06.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 13.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
ही एक्स्प्रेस संगमेश्वर रोड, अरावली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबणार आहे. 



 या सर्व विशेष एक्स्प्रेसमध्ये 18 शयनयान, 2 सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहेत. 
 या विशेष गाडीच्या आरक्षण सुरू आहे.  सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर या विशेष गाड्यांचे बुकिंग सुरू आहे. अधिक माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करावे असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.

_________________________________________________________________

                 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, सांगली, रत्नागिरी व कोकण... 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील आंबा, काजू, काळी मिरी व इतर सर्व पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...


त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
      
संपूर्ण कोकण परिसरामध्ये आपल्या शेतजमिनी योग्य दरात खरेदी करणारी एकमेव कंपनी..
त्वरित संपर्क करा..   
             www.nisargbhumi.com

                   9850155823

                   8830247886

____________________________________________________________________________________