मुख्याध्यापक राजाराम व्हनखंडे यांना राष्ट्रीय आदर्श गौरव पुरस्कार प्रदान
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली : एकात्मिक सामाजिक कल्याण सोसायटी राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन आधार, बेळगावी व गोवा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 26 मार्च 2023 रोजी गणपत पारसेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन, हरमल गोवा या ठिकाणी राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा झाला.
गोवा, दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सांगली शिक्षण संस्थेच्या श्री म. के आठवले विनय मंदिर सांगलीचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री राजाराम खंडू व्हनखंडे यांना राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक गौरव पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला.
सन्मानचिन्ह, विशेष प्रमाणपत्र, म्हैसूर फेटा चंदनाचा कायमस्वरूपी हार, केंद्रीय मंत्र्यांकडून अभिनंदन पत्र या स्वरूपात विविध मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनुर, खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी महापौर राजू शिंगाडे, जिल्हा होमगार्ड कमांडर श्री. अरविंद घाटी मा. कोमल शर्मा,विशेष अभियंता जयराज लोंढे, अतिरिक्त एसपी बिदर कर्नाटक श्री. महेश मेघनावर या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित होते.
श्री व्हनखंडे यांना यापूर्वी मा. पद्मभूषण डॉक्टर वसंतराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार, सांगली शिक्षण संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ. पतंगराव कदम आदर्श शिक्षक पुरस्कार, भारताच्या जनगणनेबद्दल राष्ट्रपती पुरस्कार, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे,
सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री. रविंद्र देवधर, शाळा समितीचे अध्यक्ष श्री. विपिन कुलकर्णी, कार्यवाह शिरीष गोसावी व सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन व सहकार्य याकामी त्यांना मिळाले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री व्हनखंडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली