सांगली जिल्हा कृषि महोत्सव २०२३ म्हणजे वाळवंटातील एक हिरवळ... प्रकाश सूर्यवंशी, प्रकल्प संचालक, आत्मा, सांगली ..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली जिल्हा कृषि महोत्सव २०२३ म्हणजे वाळवंटातील एक हिरवळ... प्रकाश सूर्यवंशी, प्रकल्प संचालक, आत्मा, सांगली ..



लोकसंदेश न्यूज़ नेटवर्क

सांगली जिल्हा कृषि महोत्सव २०२३ म्हणजे वाळवंटातील एक हिरवळ.....
प्रकाश सूर्यवंशी, प्रकल्प संचालक, आत्मा, सांगली

बदलत्या परिस्थितीत शेतकन्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देणे, प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकल्यांनी आपापसातील विचारांची देवाण-घेवाण करणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे, आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकल्याना अर्थिकदृष्ट्या उन्नत करणे- यासाठी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका व जिल्हा परिषद सांगली यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली



 व प्रकल्प संचालक आत्मा सांगली यांचे बतीने सांगली जिल्हा कृषी महोत्सव 2023 चे आयोजन कल्पद्रुम ग्राउंड, नेमिनाथ नगर, विश्रामबाग सांगली येथे दि. 17 ते 21 मार्च 2023 या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषिविषयक अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, शेतकन्यांनी उत्पादीत केलेल्या मालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री करणे, दुर्लक्षित झालेल्या पौष्टिक तृणधान्य पिकांचे महत्व ग्राहकांना पटवून देऊन या पिकाखालील क्षेत्रात वाढ करणे, विविध चर्चासत्र व परिसंवादाच्या माध्यमातून अद्यावत तंत्रज्ञान / कृषि व संलग्र विभागाच्या योजना शेतकल्यांच्या पर्यंत पोहोचविणे हा महोत्सव आयोजन करण्याचा प्रमुख उद्देश आहे.


या महोत्सवामध्ये एकूण 200 पेक्षा जास्त स्टॉल असून यामध्ये कृषी प्रदर्शन, धान्य व फळ महोत्सव आणि विविध विषयावरील परिसंवाद / चर्चासत्राचे आयोजन केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषीत केले आहे. पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांच्या आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करून लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे या प्रमुख उद्देशाने महोत्सवामध्ये पौष्टिक तृणधान्य पिकासाठी स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. 




यामध्ये पौष्टिक तृणधान्य उपपदार्थाचे प्रदर्शन व विक्री, पौष्टिक तृणधान्ये रेसिपी व पौष्टिक तृणधान्य सेल्फी पॉईंट इ. चा समावेश राहणार आहे. त्याचबरोबर महोत्सवामध्ये धान्य व फळ महोत्सव, उत्पादन ग्राहक थेट विक्री, विक्रेता खरेदीदार संमेलन, प्रगतशील शेतकरी सन्मान, कृषी निविष्ठा, कृषी तंत्रज्ञान, सिंचन, गृहउपयोगी वस्तू, विविध खाद्यपदार्थ, कृषी यांत्रिकीकरण, सुधारित जीजारे, धान्य फळपिके, फुल पिके यांचे नमुने महिला बचत गटांच्या पाककृती व फळ पिकाची कलमे/ रोपे इत्यादी दालनांचा समावेश असणार आहे.. कृषी विभागाच्या विविध स्टॉल सोबतच शासनाच्या कृषी संलग्न इतर विभागांचेही स्टॉल प्रदर्शनात ठेवण्यात आले असून त्यांच्याकडील योजनाची माहितीही शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

कृषी प्रदर्शनामध्ये खते, बियाणे, किटकनाशके, ट्रॅक्टर व सुधारित औजारे, सिंचन साधने, फळे भाजीपाला कलमे/रोपे उत्पादक/ वितरक यांना प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन स्टॉल बुकींग करावयाचे असल्यास कृषि विभागाचे श्री. संदीप खरमाटे, कृषि सहाय्यक मो.क्र. ७९७२६५१४७१/ ९८५०९०३४६५ व श्री. अमित चव्हाण तंत्रज्ञान व्यवस्थापक मो. क्र. ९८९०३२१९८३ यांच्याशी संपर्क साधावा.


सदरचे प्रदर्शन पाहण्यासाठी विनामुल्य आहे. प्रदर्शन सकाळी १०.०० ते सायं. ८.०० वाजेपर्यंत खुले राहणार आहे. तरी सांगली शहर तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी सदर प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश सूर्यवंशी प्रकल्प संचालक आत्मा सांगली यांनी केले आहे.

(प्रकाश सूर्यवंशी) प्रकल्प संचालक, आत्मा, सांगली

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.


_______________________________________________________


          या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, सांगली, रत्नागिरी व कोकण... 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील आंबा, काजू, काळीमिरी व इतर सर्व पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...



त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
      
संपूर्ण कोकण परिसरामध्ये आपल्या शेतजमिनी योग्य दरात खरेदी करणारी एकमेव कंपनी..
त्वरित संपर्क करा..   
             www.nisargbhumi.com

                   9850155823

                   8830247886

____________________________________________________________________________________