लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली नगरीची पुण्याई थोर..येणार जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. माशेलकर..!! कर्मवीर भूषण पुरस्काराचे वितरण करणार ..!!!
सांगली ही चांगली म्हणून सर्वत्र बोलबाला..! कृषी, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात ख्यातकीर्त सांगली.. आज जगप्रसिद्ध भारताचे जेष्ठ शास्त्रज्ञ, तत्वज्ञ आणि मानवतावादी विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे सांगलीतील आगमन आणि त्यांच्या करकमले होणारा कर्मवीर भूषण पुरस्कार सोहळा हा सांगलीच्या इतिहासातील सोनेरी पान आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था, कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्था म्हणजे मुळातच कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श जपणाऱ्या कल्याणकारी कामाचा केंद्रबिंदू असलेल्या संस्था. शिक्षण, शेती आणि उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या मान्यवरांची दखल घेऊन त्यांना कर्मवीर भूषण पुरस्काराने सन्मानित करणे हा या दोन्ही संस्थेचा मनस्वी छंदच आहे.
आज शनिवार दि. ११ मार्च,२०२३ रोजी दु. ४.०० वा. डॉ. शिवाजीराव कदम फार्मसी काॅलेज कसबे डिग्रज येथे डॉ. माशेलकर यांच्या शुभहस्ते शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केलेले भारती विद्यापीठ परिवाराचे डॉ. शिवाजीराव कदम यांना कर्मवीर शिक्षण भूषण , धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, व्यापार व उद्योग क्षेत्रात दखलपात्र काम केलेले मनोहरलाल सारडा यांना कर्मवीर उद्योग भूषण तर एकरी २०० टन ऊस उत्पादनाचा उच्चांक करुन शेतीला वैभव प्राप्त करून देण्यासाठी धडपडणारे ऊस संजीवनी ग्रुपचे डॉ. संजीव गणपतराव माने यांना कर्मवीर कृषी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होत आहे. पालक मंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे व माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम हे समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत.विशेष अतिथी म्हणून आमदार सुधीरदादा गाडगीळ व महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि डॉ. अनिरुद्ध पंडित, डॉ. प्रकाश कोंडेकर, डॉ. वंदना पत्रावळे, डॉ. अरविंद देशमुख व डॉ. राजेंद्र कुंभार उपस्थित राहणार आहेत.
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील आणि सर्व पदाधिकारी आणि संचालक टीम हे शिक्षण, उद्योग व शेती क्षेत्रातील भरीव कामगिरी केलेल्या व्यक्तींना कर्मवीर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा रचनात्मक उपक्रम सन २०१४ पासून राबवताहेत.कोरोना काळातील दोन वर्षे सोडता पुरस्कार वितरणाचे हे सातवे वर्ष आहे. शिक्षण, शेती व उद्योग या तिन्ही क्षेत्राच्या भल्यासाठीची ही धडपड पुरोगामी महाराष्ट्राची शान आहे. चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर शाबासकीची थाप.. ही कर्मवीर परिवाराची खासीयत प्रशंसनीय आहे. समाज हिताची दूरदृष्टी आणि तशी कृती हे या पुरस्कार वितरण समारंभाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील काॅमन मॅनच्या हितासाठी धडपडणारी माणसं समाजासमोर आणून त्यांच्या धडपडीचं कौतुक करुन त्यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि नव्या पिढीला प्रेरणा देणं हा कर्मवीर परिवाराचा प्रामाणिक प्रयत्न सांगली अधिक चांगली करण्याचा प्रयत्न आहे.
तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीच्या कसबे डिग्रज येथील भव्य अशा चार एकर परिसरात महावीर स्टेट अकॅडमीची इंग्रजी माध्यम शाळा व सुमारे ६९० फार्मसीच्या पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविणाऱ्या डॉ. शिवाजीराव कदम फार्मसी काॅलेजवर हा सोहळा दिमाखात संपन्न होत आहे. भव्य दिव्य मंच... अलिशान बैठक व्यवस्था ..आणि डॉ. रघुनाथ माशेलकर व डॉ. शिवाजीराव कदम यांना ऐकण्याची संधी हा फार मोठा चान्स सांगली आणि परिसरातील शिक्षक, विद्यार्थी, विविध संस्था चालक आणि नागरिकांना मिळत आहे. पुरस्कार सोहळा हा नव्या पिढीचा प्रेरणोत्सव करण्यात रावसाहेब पाटील आणि कर्मवीर परिवार हा एक ब्रँड अम्ब्यासॅडरच म्हणावा लागेल.
आम्ही कर्मवीर भूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करतो आणि कर्मवीर परिवाराला धन्यवाद देऊन महासत्ता म्हणून मिरवणारी अमेरीकाही ज्यांना सन्मान देते व भारताची बलाढ्य शक्ती असा ज्यांचा उल्लेख होते ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. माशेलकर यांना जवळून पहाणे व ऐकण्यासाठी जरुर या सोहळ्यात उपस्थित रहावे असे आवाहन करतो.
कर्मवीर भूषण पुरस्कार वितरण सोहळा , शनिवार दिनांक 11 मार्च 2023
डॉ शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मशी , कसबे डीग्रज सायंकाळी 4 वाजता
आग्रहाचे निमंत्रण .....
प्रा. एन.डी.बिरनाळे
कार्याध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक सेल .
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली