लोकसंदेश न्यूज नेटवर्क
RATNAGIRI
लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ एकवटले..
अखेर नगराध्यक्ष, प्रशासनाने नमते घेतल्याने वाद निवळला
लांजा :- लांजा नगरपंचायत सर्व साधारण सभेच्या वेळी प्रभाग क्रमांक ४ मधील प्रतिष्ठित नागरीक आणि प्रभागातील नगरसेवक श्री.लहू कांबळे यांनी विकास कामांच्या मुद्द्यांवर जोरदार हंगामा केला. नगराध्यक्ष श्री.मनोहर बाईत यांच्या मनमानी धोरणामुळे प्रभागातील मंजूर झालेली कामे इतरत्र परस्पर संगनमताने हलवून आपली पोळी भाजत असल्याचा केला आरोप त्यांनी केला.
सविस्तर वृत असे की, प्रभाग क्रमांक ४ हा अनुसूचित जाती जमाती साठी आरक्षित प्रभाग असल्याने अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत रस्ते,पाखाडी,गटारे या विकास कामांच्या मंजूर झालेली विकासकामे नगराध्यक्ष बाईत यांच्या मनमानी कारभार करण्याच्या पद्धतीने आणि स्वतःच्या प्रतिष्ठेकरीता स्थानिक नगरसेवकांना विचारात न घेता परस्पर संगनमताने इतर प्रभागात वर्ग केला, याबाबत नगराध्यक्ष यांना भर सभेमध्ये नागरीकांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता नगराध्यक्ष बाईत यांनी नागरिकांना तुम्हाला सभेत येण्याची परवानगी कुणी दिली? तुमच्यावर आताच्या आता पोलीस ठाण्यात तक्रार करून प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला, असा गुन्हा दाखल करतो, असे सांगत नागरिकांना सभागृहातून हाकलून द्या असे कर्मचाऱ्यांना आदेश दिले, यावर उपस्थित नागरीकांनी आम्हाला विकास कामांबाबत बोलायचे होते. जर तुम्ही पोलिस कारवाई करणार असाल तर खुशाल आम्ही पोलिस कारवाईला सामोरे जाऊ, तसेच प्रभागाचे नगरसेवक लहू कांबळे यांनी माझ्या नागरिकांसाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल असे ठणकावून सांगितले, विशेषतः लोकनियुक्त नगराध्यक्ष बाईत यांनी हे बोलणे विधायक नसून समाजात तेढ निर्माण करून स्थानिक नगरसेवक आणि प्रभागातील नागरीक यांच्या मध्ये नाहक वाद घडवून विकास कामांना खीळ घालण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप करण्यात आला.
ज्या प्रभागात कामे वर्ग झाली ते नगरसेवक श्री.डोंगरकर हे नागरिकांवर आगपाखड करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले, ग्रामस्थांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहून नगराध्यक्ष आणि प्रशासन यांना नमते घ्यावे लागले आणि भविष्यात पुन्हा असे घडले तर संतप्त ग्रामस्थांनी पुन्हा उपोषणाला बसण्याचा तसेच आंदोलनाचा इशारा दिला, आरक्षित असलेल्या प्रभागातील निधी नियमानुसार अध्यादेशाप्रमाणे त्याच आरक्षित प्रभागात विकासकामांसाठी वापरला जाईल याची प्रशासनाकडून हमी घेऊनच ग्रामस्थ शांत झाले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.
_____________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. ...
कौशल्य इंडिया ची मार्गदर्शक कंपनी....
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
&
AMMU AUTO PARTS PVT. LTD.
MUMBAI.
सर्व प्रकारच्या कार व जुनी 4 व्हीलर व 6 व्हीलर वाहने खरेदी करणारी ISO - 9001-2015 रजिस्टर कंपनी...
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व युजड व न्यू र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
हेड ऑफिस: महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्राइवेट लिमिटेड, महाराष्ट्र स्क्रॅप, शंभरफुटी रोड, नुराणी मशीद जवळ, सांगली.
कार्पोरेट ऑफिस; महाराष्ट्र ऑटोमोबाईल्स,सुपरवाला मार्केट, शॉप नं 9,अंतिकाबाई जोशी मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई.
9850516355
www.caroldpart.com
__________________________________________________________________