लोकसंदेश न्यूज नेटवर्क
बैलावरील भार होणार हलका..
ॲनिमल राहतच्या प्रयत्नांना आ.सुधीर गाडगीळ यांची साथ
साखर कारखान्यामध्ये बैलांपासून होणारी ऊस वाहतूक प्रक्रियेचे संपूर्ण यांत्रिकीकरण करण्याबाबत चे निवेदन ॲनिमल राहतच्या वतीने आ.सुधीर गाडगीळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून दिले आणि त्या संदर्भात पाठपुरावा चालू आहे.
महाराष्ट्र राज्यात साखर गळीत हंगाम सूरु झाला असून सदरच्या साखर गळीत हंगामासाठी बैलांचा वापर ऊस बैलगाडीतून ओढून/वाहून नेण्यासाठी खूप मोठया प्रमाणात केला जातो,महाराष्ट्रातील २७४ साखरं कारखान्यापैकी २०२ सहकारी आणि ७२ खाजगी असून या कारखान्यांसाठी अंदाजे २५०००० बैलांचा वापर ऊस ओढून/वाहून/वाहतूक करण्यासाठी केला जातो.
सदरील साखर कारखान्यांसाठी ऊस वाहत असलेल्या बैलांनवरती खूप मोठया प्रमाणात अत्याचार केले जातात जसे कि १)क्षमतेपेक्षा जास्त वजन लादणे २)टोकदार खिळे लावणे ३)आजारी बैलांनापासून काम करवून घेणे...
असे अनेक अत्याचार बैलांन वरती केले जातात,बैलांन पासून होणाऱ्या गतीहीन ऊसाच्या वाहतुकीमुळे मुख्य वाहतुकीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होऊन अपघात ही होतं आहेत शिवाय ऊस वाहतूक करणाऱ्यां कडून सदरील बैलं तात्पुरत्या हंगामा साठी बाजारातून विकत घेतली जातात अणि हंगाम संपल्यावर ती विकली जातात ,विकली गेलेली बैलं,दुखावलेली,अपंग,जखमी झालेली बैलं कामास अयोग्य झाल्याने त्यांना कत्तलखान्यामध्ये विकले जाण्याची शक्यता जास्त असते
बैलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्यांना कत्तलखान्यामध्ये मध्ये विकले जाऊ नये यासाठी महाराष्ट्रातील सर्वचं साखर सारखान्याचे ऊस वाहून नेण्याच्या पद्धतीचे यांत्रिकीकरण व्हावे यासाठी गेली दहा वर्ष ॲनिमल राहत सात्यत्याने प्रयत करत होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली