साखळकर यांना कवलापूर विमानतळ याबद्दल जुने पुरावे हवेत असे वर्तमानपत्रात वाचले ....
हा फोटो ..श्री यशवंतराव चव्हाण मुख्य मंत्री असताना आम्ही (मी पुढे ड्रम वाजविणारा 😊) सांगली हायस्कूल चां बँड घेऊन कवलापूर विमानतळावर गेलो होतो व ते जवळ येताच राष्ट्र गीत वाजविण्यास सुरवात केली त्यांना थांबावे लागले 😊
श्री वसंतदादा यांनी श्री यशवंत राव चव्हाण यांस उन लागू नये म्हणून छत्री धरली आहे साल अंदाजे १९६७ असावे..
सांगलीतील जुन्या आठवणींना उजाळा..
आज वय वर्ष 70 असलेले वयोवृद्ध शहाजी लक्ष्मण मोरे यांनी कवलापूर विमानतळा बद्दल लोकसंदेश न्यूजशी संवाद साधताना म्हणाले की, ज्या वेळेला सिविल हॉस्पिटलचे उद्घाटन होणार होते, त्यावेळेस मारोतराव कन्नमवार मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे येणार होते ,म्हणून सांगलीतील सर्व लोकांनी आपापल्या हातात खोरेपाट्या घेऊन ती धावपट्टी तयार केली होती नंतर ती धावपट्टी पाहण्यास मुंबईहून आलेल्या लोकांनी विमान उतरण्यास योग्य असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर सदरील विमानतळावर विमान पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांना घेऊन या विमानतळावर उतरले होते त्यावेळी मी शहाजी मोरे व माझे काका एकनाथ बंडू मोरे आम्ही सर्व सायकल वरून विमान पाहण्यासाठी कवलापूर विमानतळावर गेलो होतो त्यावेळेला मी एका सीटी पोलिसांकडून मुस्काडी ती मारून घेतलेली होती, कारण मी सायकल रस्त्याच्या मधून चालवत होतो आणि पाठीमागून वाहने येत होती त्यामुळे मान्यवरांच्या गाडींना रस्ता देण्यासाठी पोलिसांनी मला ओढून बाजूला काढले व एक कानशिलात ठेवून दिली, परंतु त्या स्थितीत आम्ही विमान पाहण्यासाठी गेलो आणि आयुष्यात पहिल्यांदाच जमिनीवर उतरलेले कवलापूर विमानतळावरील विमान स्वतः डोळ्यांनी पाहिल.. त्यानंतर मारोतराव कन्ननवार हे गाडीने कार्यक्रमाला गेले ,परंतु आम्ही मात्र विमान कसे उडते हे पाहण्यासाठी तेथेच थांबून होतो ,तर सांगण्याचे तात्पर्य हे की, कवलापूर विमानतळ हे सांगलीकरांच्या हातच्या जोरावर केलेल्या कष्टावर दगड धोंडे उचलून तयार केलेले .. सांगलीसाठी अशा पल्लवीत करणारे असे विमानतळ होते.. ते कुठल्याही परिस्थितीत पुन्हा चालू झाले पाहिजे ही आजची गरज आहे असे मला तरी वाटते आज माझे वय सत्तर वर्षाचे आहे पुढील काळ मी पाहू शकतो किंवा नाही त्याची शाश्वती नाही. परंतु ही बाब सांगलीच्या वैभवात भर पडणारी निश्चित आहे म्हणून आपणा सर्वांना नम्र विनंती की ,या विमानतळासाठी आपण जास्तीत जास्त वेळ देऊन त्याला प्राधान्य द्या जय भीम
शहाजीराव लक्ष्मण मोरे.
चिन्मय पार्क, सांगली
8766785123
सांगलीकर जनतेला आवाहन....
#कवलापूर विमानतळ
आपल्याकडे ह्या बाबतीत काही माहिती ,पुरावे असतील तर आमच्याकडे द्यावी. अशी विनंती आहे
सतीश साखळकर
विमानतळ बचाव कृती समिती सांगली जिल्हा
9881066699
satishsakhalkar19@gmail.com
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली
_________________________________________________
संपादकीय,
सांगली... गणपती बाप्पाच्या नगरीत वसलेली व प्रगत झालेली.. सांगली..
संपूर्ण देशात नावारुपास असलेली सांगली... परंतु अशा सांगलीसाठी अलीकडे एक ग्रहण लागलेल आहे..
आणि हे ग्रहणच सांगलीच्या प्रगतीच्या आड येत आहे. हे ग्रहण सांगलीच्या राजकारणातून लागलेल आहे
त्यामुळे सांगलीच्या नागरिकांची कुचंबना होत आहे.
इंग्रज सत्तेत असताना सुद्धा सांगलीला एक बघण्याची त्यांची वेगळी दृष्टी होती. . जसे राम मंदिर पासून मिशन हॉस्पिटल पर्यंतची सर्व जागा मिशनणाऱ्यांनी आपल्यासाठी राखीव ठेवलेली होती... त्याच्या बाजूला रेल्वेचे प्लॅटफॉर्म टाकण्यात आले होते ..ते सांगलीसाठी प्रगतीचे होते... नंतर सांगलीचा विस्तार झाला या विस्तारातून सांगलीला एक चांगला मोठा साखर कारखाना वसंतदादांनी स्थापित केला, त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना याचा नक्कीच फायदा झाला अर्थात ही बाब आताची नवी पिढी जाणू शकत नाही. त्यानंतर सर्व शेती विषयक, मालाच्या विक्रीसाठी मार्केट यार्ड, पाण्याच्या योजना, या काळात आल्या त्यानंतर सांगलीची बाजारपेठ हळदीने पिवळी होऊन गेली व जगविख्यात हळद म्हणून चांगलीच हळद प्रसिद्ध झाली, त्याच्यानंतर तासगावचे द्राक्षे ,बेदाणे सांगली मधून निर्यात होऊ लागले त्या बऱ्याच उद्योग आणि व्यवसायानी सांगलीचे नावलौकिक पूर्ण जगात झालं.... मात्र.....
सांगलीला राजकीय ग्रहण लागल आणि सांगलीची अधोगती सुरू झाली...
आता ह्या राजकारणातून प्रत्येक पक्षाच्या राजकारण्याने आपल्या सत्तेसाठी सांगलीचा "वाटोळच" केलेल आहे.
कारण या लोकांना सांगली विषयी कोणती ही "आस्था"नाही फक्त यांना आपलं राजकारणात बघायचं आहे
त्यामुळे सांगलीतील एक एक उद्योग ,एमआयडीसी, कारखाने व द्राक्षाचे बाजारपेठ, मार्केट यार्ड ,संपूर्ण बाहेर जाण्यास फक्त ही राजकारणी मंडळी जबाबदार आहेत
सांगलीमध्ये मोठ दुःख अस आहे की, सांगलीकरांनी ज्यांना ज्यांना ह्या दहा वर्षात निवडून दिलं त्यांनी त्यांनी या सांगलीचं फक्त "वाटोळ" करण्यापलीकडे काही केलेलं नाही.
सांगलीमध्ये रस्त्याची, गटारीची काय , काय अवस्था आहे, शेरीनाला , याविषयी याला काही देणं घेणं नाही..चार उगाच भिंती रंगवून, त्यात घोडे ,बकरी व हत्तीचे पुतळे उभे करून म्हाताऱ्या सांगलीला तरुण करण्याचे कार्य काही पूर्वी सांगलीचे आयुक्त करून निघून गेले. . ( (त्यांच्याबरोबर मोठमोठे ठेकेदार .. बर्मुडा घालून कुत्री फिरवणारे सामील होते ..का तर त्यांना साथ देण्यात त्यांचा आर्थिक लाभ होता))
सांगलीकरांच्या व्यथा ना आयुक्ताला कळाल्या. ना या बरमूडावाल्यांना कळाल्या. .. .
सर्वसाधारण कोणत्याही शहराच्या प्रगतीसाठी त्याला महामार्ग कनेक्टिंविटी असावी, त्याला विमानतळ असावं तर अशा शहराची प्रगती होते सर्व ज्ञात आहे ....पण...
या इथल्या राजकारण्यांना हे कळत नाही आणि या सांगलीकरांना उल्लू बनवून आपण आपली राज्यसत्ता कशी हातात ठेवता येईल एवढंच कार्य हे करत असतात..
कवलापूर विमानतळाचा प्रश्न..
160 एकर जागा विकली गेली विकायचा घाट घातला. तो कोणी घातला हे सगळ्यांना सर्वज्ञात आहे
त्यानंतर मार्केट यार्ड, साखर कारखाना, बँका, सांगलीचे उद्योग बाहेर नेण्यासाठी षडयंत्र कोणी केल हे सर्व ज्ञात असताना सुद्धा सांगलीकर उल्लू बनून त्यांनाच मतदान करते हे आपलं दुर्दैव आहे....
सांगलीच्या विकासासाठी सतीश साखरकर सारखा तरुण आपला कोणताही लाभ नसताना चांगले विषय सांगलीसाठी आपल्या सहकार्यांसह हे कार्य करत असतो परंतु... त्याच्यासाठी काही "झारितले शुक्राचार्य".. त्यांच्या आडवे येत असतात हे परवा नितीन गडकरी साहेबांच्या भेटीचे वेळेला दिसून आलेल आहे ...
संपादक म्हणून किंवा सांगलीत जन्म झाला म्हणून आम्हाला असं वाटतंय. की,.
मिशन हॉस्पिटल ते शास्त्री चौकाचा मिरजेचा रस्ता, या दहा वर्षात कधी झाला नाही , सांगली शंभर फुटीची दैना आपण या डोळ्यांनी गेली दहा वर्ष पहात आहोत, ..सांगली सांगली स्वच्छ पाणीपुरवठा व पाण्याचा साठा करणारे धरण काढण्याचे षडयंत्र कोणी केले, याची सर्व जाणीव सांगलीकर नागरिकांना आहे
या दहा वर्षात बरीच सत्तांतरी झाली परंतु कोणत्याही पक्षांनी सांगलीसाठी काहीही केलं नाही.. याच कारणच असं आहे की, यातील काही लोकप्रतिनिधी सांगलीतील आहेत व काही लोकप्रतिनिधी सांगली शहराच्या बाहेरचे आहे त्यांना सांगली बद्दल कोणतीही "आस्था" नाही त्यांनी आप आपली गाव डेव्हलप करून घेतलेली आहेत , मात्र सांगलीसाठी त्यांना कांहीं करण्याची इच्छा व मानसिकता नसल्याने सांगलीच "वाटोळं " झालेल आहे आम्ही प्रत्येक लेखात म्हणतो की "सांगलीचा एक वेळा पूर्ण वाटोळ झालं की आम्ही आमच्या आमच्या गावी झोला लेके जाणेसाठी तयार आहोत" असा काही प्रत्यय आपणास सांगलीकरांना दिसत आहे आणि ते असंच होणार आहे...
याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे...सांगलीला कोणत्याही प्रकारची गरज व भौगोलिक व आर्थिक परिस्थिती नसताना "अण्णासाहेब डांगे "यांनी मदन भाऊच्या राजकारणातून सांगलीची "महापालिका" केली ..पण ते "आपल्या गावी निघून गेले" मात्र सांगलीकरांना महापालिकेची कोणतीही सुविधा नसताना कर भरून सांगलीकर आता आपल्याच घरात भाड्याने राहत असल्याचे दिसून येत आहे... असाच काहीचा प्रकार ह्या राजकारणाच्या बाबतीत होणार आहे .
सांगलीकरानो आपण सावध राहा ...
नमस्कार
सलीम नदाफ:
संपादक; लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली
8830247886