शेअर मार्केटमध्ये राखरांगोळी, अब्रू गमावली, आता मोदी सरकारनेही अदानींचा हात सोडला....
नवी दिल्ली: हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे याचि देहि याचि डोळा स्वत:च्या आर्थिक साम्राज्याची राखरांगोळी होताना पाहण्याची वेळ ओढावलेले गौतम अदानी सध्या चहुबाजूंनी संकटात सापडले आहेत. एकीकडे शेअर मार्केटमध्ये अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग धडाधड आपटताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अदानी समूहातील सर्व कंपन्यांच्या समभागांनी निचांकी पातळी गाठली आहे. यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक,सेबी आणि जागतिक पतमानांकन संस्थाही अदानी समूहाकडे संशयाने पाहायला लागल्या आहेत.
अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. मोदी सरकार हळूहळू अदानी यांच्यापासून फारकत घेताना दिसत आहे. जे सोप्या पद्धतीने येतं, ते तितक्याच सोप्या पद्धतीने जातं, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. मोदी सरकारच्या काळात गौतम अदानी यांच्या साम्राज्याची ज्याप्रकारे भरभराट झाली आहे, त्याकडे स्वामींचा रोख असल्याची चर्चा आहे.
एवढेच नव्हे तर सुब्रमण्मय स्वामी यांनी अदानी समूहाच्या मालकीच्या सर्व मालमत्तांचे राष्ट्रीयकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जेणेकरून भविष्यात या मालमत्तांचा लिलाव करुन पैसे वसूल करता येतील, असे स्वामींचे म्हणणे आहे. गौतम अदानी हे सरकारची विशेष मर्जी असलेले उद्योगपती असल्याचा आरोप आजवर अनेकांनी केला होता. परंतु, हिंडेनबर्ग रिपोर्ट समोर आल्यानंतर अदानी यांचे ग्रह फिरल्याचे दिसत आहे. कालपर्यंत उद्योगविश्वात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेला त्यांचा दबदबा झपाट्याने कमी होताना दिसत आहे.
अमेरिकन भांडवली बाजारातील डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून अदानी एन्टरप्रायजेस ही कंपनी डी लिस्ट करण्यात आली आहे. या निर्देशंकात जगभरातील आघाडीच्या कंपन्यांचा समावेश असतो. परंतु, अलीकडे शेअर बाजारात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या झालेल्या वाताहतीमुळे dow jones sustainability indices मधून अदानी एन्टरप्रायजेसची गच्छंती झाली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी याच मुद्द्यावर बोट ठेवत भारतीय शेअर बाजारात अदानी समूहावर अशाप्रकारची कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान..........
अदानी समूहाविरोधात देशव्यापी आंदोलन उभे करणार....
काँग्रेसतर्फे सोमवारी देशभरातील LIC आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांबाहेर आंदोलन केले जाणार
चौकशी करण्यासाठी संसदेच्या संयुक्त समितीची स्थापना (जेपीसी) करण्याची मागणी
अदानी समूहाच्या कंपन्यांचे भांडवली बाजारातील मूल्य लक्षणीयरित्या घटल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अदानी समूहाचा सर्व डोलारा बँकांकडून घेतलेल्या कर्जावर उभारला होता, असा आरोप नेहमीच होतो. त्यामुळे आता अदानी या कर्जाची परतफेड करू शकतील का, असा सवाल सातत्याने विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून ६ फेब्रुवारी रोजी देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये LIC आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांबाहेर आंदोलन केले जाणार आहे. या सगळ्याची चौकशी करण्यासाठी संसदेच्या संयुक्त समितीची स्थापना (जेपीसी) करण्यात यावी, अशी मागणीही काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.
याशिवाय, यूपीए सरकारच्या काळात लोकपाल आंदोलनात सहभागी झालेल्या अंजली दमानिया यांनीदेखील अदानी समूहाविरोधात आंदोलन व्हायला पाहिजे, असा प्रस्ताव मांडला आहे. लोकपाल आंदोलनाप्रमाणे पे बॅक आंदोलन झाले पाहिजे. अदानी समूहाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड आणि एलआयसीचे पैसे परत केले पाहिजेत, असे अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.
_______________________________________________
संपादकीय,
"अंधेरी नगरी चौपट राजा टके सेर भाजी टके सेर खाजा" असा काही प्रत्यय आता भारतीय नागरिकांना येऊ पाहत आहे याच कारण अस आहे की, सत्तेच्या लोभापोटी आपलं साम्राज्य जिवंत ठेवण्यासाठी आम्ही काहीही केलं तर आम्ही पूर्ण बहुमतात आहोत त्यामुळे आम्ही काहीही करू अशा वृत्तीचे नेते जर आपल्यावर राज्य करत असतील तर हा "अडाणी" पणा होणारच आहे
गेल्या सत्तर वर्षात ज्या ज्या राजकर्त्यांनी या देशावर राज्य केलं त्या त्या वेळेला भारत हा एक संघ देश आहे आणि सर्व भारतीयांच्या मनाने मताप्रमाणे हा देश व सरकारे चालत होते.. परंतु आता ही भावना व या राज्यकर्त्यात राहिली नाही भारतीय जनता पार्टीचे वाजपेयी साहेब यांनी देखील भारत देशावर राज्य केलेल आहे,... सहभाग घेतला होता, त्या वेळी काँग्रेसचे राज्य होतं.. त्या वेळेला वाजपेयी जरी विरोधी पक्षात असतील तरी .. त्यांचा विचार घेतला जायचा ....परंतु आज "हम करे सो कायदा " अशा वृत्तीचे जर नेते आपल्यावर राज्य करत असतील मग असा "अडाणी" पणा होणारच आहे ,
मराठीत एक म्हण आहे की "आडग्यांच्या राज्यात आणि माकडाच्या हातात कोलीत" दिल्यानंतर काय घडू शकते... याचा प्रत्यय आता प्रत्येक भारतीयास येत आहे... "अच्छे दिन" चा झासा देऊन आपण राज्यसत्ता तर हस्तगत केली ,कोणी म्हणते मशीनचा घोटाळा वगैरे केला अर्थात हे सर्व देवच जाणे ...मात्र भारतीयांचं काय आता खरं नाही. ... Chokshi पळून गेला ,निरव मोदी पळून गेला, विजय माल्या पळून गेला, आता अंबानी असो ,अडाणी असो ,यांना पळून जायला वेळ लागणार नाही ...हाल होणार आहे ते जनतेचे.. एखाद्या गरीब व्यापाऱ्यांने, शेतकऱ्याने लाख दोन लाख रुपये कर्ज घेतल्यानंतर ज्या तत्परतेने बँका कारवाई करतात त्या तत्परतेनेच यांच्यावर कारवाई होणार का?? असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत, या मध्ये आता सरकार, सीबीआई, इडी,बिडी, सर्व जबाबदार सरकारी यंत्रणा ,काही बोलायला तयार नाहीत... मोदी गोदी मीडिया याच्यावर कोणीही बोलायला तयार नाहीत.. आता तर गोदी मीडिया "अडाणी_ कसा चांगला होता आणि आहे याच्यावरच डिबेट चालवतात...असं कधी झालेलं नव्हतं... लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता आहे आणि त्यांनी खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटंच म्हणायला पाहिजे ...परंतु ही गोदी मीडिया सरकारच्या मांडीवर जाऊन बसलेली आहे.. त्यांच्याकडून काय अपेक्षा करा??
आता ही "हिटलरशाही" फक्त आपल्याला या आठ दहा वर्षातच बघायला मिळत आहे... भारतीयांचे नशीबच म्हणायचं .. कोणताही देश... कोणताही उद्योग ..सर्वसामावेशक .. सर्वांशी सल्लामसलत व चर्चा करूनच चालवायचा असतो... ते काय पानाचे दुकान नाही की मी चुना लावला, मीच पान विकल असं होत नाही.. भारत देश फार मोठा आहे आणि या देशांमध्ये दोन-चार टाळक्याने हा देश चालणार नाही ,त्यांच्याबरोबर चार समंजस विरोधकांना पण घेऊन आपण राज्य केलं तर या देशाचे कल्याण अन्यथा "बरबादी" तर ठरलेलीच आहे याच्या मध्ये सर्वानुमते हा देश चालणार आहे... परंतु ऐकणार कोण??
टीप: आता पुढील वर्षी निवडणूक येत आहेत, ही टीप लक्षात ठेवा.. आता एखादा हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान ,असा एक मोठा विषय ही मंडळी जोरदारपणे आणतील व घडवतील आणि हे सर्व प्रगतीचा विषय, भारताचा विकास, रोजगारीचा प्रश्न ,निरव मोदी, विजय माल्या, अडाणी वगैरे इतर सर्व प्रश्न त्यामध्ये "दफन" होऊन जातील, हे सर्व फक्त निवडणुकीपूर्वी सहा महिन्यात हे होणार आहे... हे आम्ही सांगत नाही ही नेहमीची प्रथा आहे....
फक्त आता आपण पहात रहा..
संपादक :लोकसंदेश न्यूज मीडिया
8830247886