लोकसंदेश न्यूज नेटवर्क
अजिंकियन वुमन फौंडेशनतर्फे रविवारी हळदी-कुंकू समारंभ
सौ. मंजिरीताई गाडगीळ; महिलांसाठी शिवणकला, हस्तकला, खाद्यपदार्थ, रुग्णसेवा प्रशिक्षण नोंदणी ; सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन...
महिला सक्षमीकरणासाठी अग्रेसर अजिंकियन वुमन फौंडेशनतर्फे उद्या रविवार 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यन्त कोकितकर लॉन येथे हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान महिलांसाठी शिवणकला, हस्तकला, खाद्यपदार्थ, रुग्णसेवा प्रशिक्षण नोंदणी सह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समाजपयोगी योजनांसाठी नोंदनीही करण्यात येणार आहे. महिलांनी पॅन कार्ड, आधार कार्ड व दोन फोटोसह कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन फौंडेशनच्या संस्थापिका सौ. मंजिरीताई गाडगीळ यांनी केले आहे.
सौ. गाडगीळ म्हणाल्या, अजिंकियन वुमन फौंडेशनने पाच वर्षे यशस्विरीत्या पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे. सायंकाळी 5 वाजता कार्यक्रमास सुरवात होईल. महालक्ष्मी महिला मंडळ, कोल्हापूर यांचा सोंगी भजन आणि भारुड या संस्कृतीक कार्यक्रम होणार आहे. याशिवाय महिलांसाठी शिवणकला, हस्तकला, खाद्यपदार्थ, रुग्णसेवा प्रशिक्षण तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समाजपयोगी योजनांसाठी नोंदणीही केली जाणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, सुकन्या योजना, ई श्रमिक पेन्शन योजना आदी योजनांचा समावेश आहे.
याशिवाय शहरी महिला बचत गटांचे बँक खातेही उघडण्यात येणार आहे. यासाठी दोन फोटो, आधारकार्ड, पॅनकार्ड झेरॉक्ससह महिलांनी समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन करत सौ. गाडगीळ म्हणाल्या, समारंभादरम्यान सन २०२३-२४ या वर्षासाठी सदस्यांची नाव नोंदनीही करण्यात येणार आहे. बँक आपल्या दारी उपक्रमांतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र, कनेरा बँक आणि युनियन बँकेचे स्टॉल ही असणार आहेत. या समारंभास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सौ. गाडगीळ यांनी केले आहे. यावेळी फौंडेशनच्या अध्यक्ष सौ. रिटा शहा व सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.
_________________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. .
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली,
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...
त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या
www.nisargbhumi.com
8830247886
____________________________________________________________________________________