लोकसंदेश न्यूज नेटवर्क
देशाच्या अमृत काळातील 'सर्वजनहिताय' अर्थसंकल्प ,विकास व रोजगार निर्मितीला गती मिळेल : आमदार सुधीर दादा गाडगीळ
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प समाजातील शेवटच्या व्यक्तीपासून शेतकरी, आदिवासी, महिला, युवा, मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांना दिलासा देणारा आहे. देशाच्या अमृतकाळातील सर्वजनहिताय असा हा अर्थसंकल्प आहे, असे मत आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले. या अर्थ संकल्पामुळे देशात विकास आणि रोजगार निर्मितीला गती मिळेल असेही आमदार गाडगीळ यांनी सांगितले.
आमदार गाडगीळ म्हणाले, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ, सबका विकास' या संकल्पनेचे प्रतिबिंब या अर्थ संकल्पामध्ये उमटले आहे. समाजातील शेवटच्या व्यक्ती केंद्रबिंदू मानून अर्थ संकल्प सादर करण्यात आला आहे. देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम प्रोत्साहन देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीला गती मिळणार आहे. उडान योजनेला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दळणवळणाची यंत्रणा सक्षम होणार आहे.
'आत्मनिर्भर भारत' यावर भर देण्यात आला आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. नैसर्गिक शेतीला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रसायनमुक्त, पारंपरिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यात येणार आहे. शेती, पायाभूत सुविधा, रस्ते, शिक्षण, लघु-उद्योग, पर्यावरणपूरक विकास, ग्रामीण भागांचा विकास यांसारख्या अनेक गोष्टींवर अर्थ संकल्पामध्ये भर देण्यात आला आहे. यामुळे देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असेही आमदार गाडगीळ यांनी सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.