लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
व्हाइॅस ऑफ मीडीया’ची जिल्हा कार्यकारणी जाहीर...
सांगली, ता. ३१ ः पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी देशातील १७ राज्यात कार्यरत ‘व्हाईस ऑफ मीडीया’ या पत्रकार संघटनेची सांगली जिल्हा व सांगली शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संस्थापक संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनी कार्यकारणीची घोषणा केली.
पत्रकारीता व पत्रकारांसाठीचा लढा, हे ध्येय ठेवून संघटनेची स्थापना झाली आहे. संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत ५० संपादकांनी एकत्र येत देशव्यापी पत्रकार संघटना स्थापना केली आहे. पत्रकारांसाठी घर, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, अपघात विमान व भविष्य पुंजीबाबत तरतूदीसह नवीन तंत्रज्ञानाशी अवगत करणे, निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन ही संघटनेची पंचसुत्री आहे.
संस्थापक संदीप काळे, राज्याध्यक्ष राजा माने, पश्चिम विभागीय अध्यक्ष अभिजीत देशमुख यांच्या मान्यतेने जिल्हा व शहर कार्यकारणी जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनी जाहीर केली. कार्याध्यक्ष उध्दव पाटील, संजय गायकवाड, सरचिटणीस शितल पाटील, प्रवक्ता अजित झळके यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. सांगली जिल्हाध्यक्ष व्हाईस ऑफ मीडीयाची मजबूत बांधणी करण्यासाठी व जिल्ह्यातील पत्रकारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यकारिणी अशी - जिल्हाध्यक्ष - सचिन मोहिते (पुण्यनगरी), कार्याध्यक्ष उध्दव पाटील (पुढारी), कार्याध्यक्ष संजय गायकवाड (तरुण भारत), उपाध्यक्ष संजय हेब्बाळकर (केसरी), उपाध्यक्ष कुलदीप माने (एबीपी माझा), उपाध्यक्ष - संजय देसाई ( लोकशाही न्यूज ), उपाध्यक्ष शरद जाधव (लोकमत), सरचिटणीस - शितल पाटील (लोकमत), सहसरचिटणीस मोहन यादव (पुढारी), कार्यवाहक रावसाहेब हजारे (तरुण भारत), नरेंद्र रानडे (पुण्यनगरी), सरफराज सनदी (मी मराठी),प्रवक्ता अजित झळके (सकाळ), खजिनदार अभिजीत डाके (ॲग्रोवन), संघटक विष्णू मोहिते (सकाळ), हेमंत मोरे (केसरी), दत्ता शिंदे (लोकमत), असिफ मुरसल (लोकमत न्यूज), किरण पाटील (पुण्यनगरी), ॲड. विक्रांत वडेर (प्रतिध्वनी), गणेश पाटील (हॅलो प्रभात).
सांगली शहर कार्यकारणी - सांगली शहराध्यक्ष - विक्रम चव्हाण (तरुण भारत), कार्याध्यक्ष शैलेश पेठकर (सकाळ), सागर खंबाळे (पुढारी), उपाध्यक्ष - रामचंद्र वाघमारे (पुण्यनगरी), दीपक कांबळे (सी न्यूज), सुभाष वाघमोडे (तरुण भारत), विजय पाटील (साम न्यूज), कार्यवाहक - मुकूंद मोहिते (प्रतिध्वनी).
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली