सांगलीची कबड्डी,आणि लाल माती आज धन्य धन्य झाली....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगलीची कबड्डी,आणि लाल माती आज धन्य धन्य झाली....



लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी / अभिजित शिंदे.
सांगली .

सांगलीची कबड्डी,आणि लाल माती आज धन्य धन्य झाली.

 महाराष्ट्राच्या कबड्डी परंपरेतील पहिला शिवछत्रपती पुरस्कार पटकवणारी रणरागिणी चित्रा नाबर यांचा सत्कार सोहळा*  *आझाद व्या मंडळ  सांगली आणि सांगली जि कबड्डी असो यांचे वतीने विविध क्षेत्रात ज्यांनी  आपले कर्तृत्व सिद्ध केले त्यांचा सत्कार सोहळा आझाद व्यायाम मंडळ येथे संपन्न* *प्रथम श्रद्धांजली घेण्यात आली त्यानंतर सर्व मान्यवर यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले,प्रास्ताविक श्री सागर रामभाऊ घोडके यांनी केले त्यांनी आझाद व्या मंडळाची वाटचाल याचा आढावा घेतला त्यानंतर श्री चेतन  राजेंद्र माळी यांनी संगणक क्षेत्रात उत्कृष्ठ काम केले त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेने आणि अतुल आठवले  महानगरपालिका सांगली अधिकारी यांनी कोरोना,महापूर या  काळात आपला जीव धोक्यात घालून जनसेवा केली याबद्धल त्यांना मेमेंटोआणि बुके देऊन सन्मान केला,कबड्डी मध्ये अनेक मुलींनी यश मिळवले त्यांचाही सत्कार चित्रा नाबर मॅडम यांनी केला यामध्ये श्लोका पाणबुडे, श्रावणी भोसले,ऋतुजा आंबी,भक्ती महाडिक यांचा सन्मान केला ,श्री रोहित बने राष्ट्रीय कबड्डी खेळाडु याची महाराष्ट्र पोलीस संघात निवड झाली त्यांचा सत्कार मान्यवर यांनी केला.



       महाराष्ट्र शासन यांनी कबड्डी क्षेत्रातील उतुंग कामगिरीबद्धल शिवछत्रपती पुरस्कार 1972 सालीं सुरू केला तो पहिला पुरस्कार मिळवणारी कबड्डीची राणी,गुण मिळवून देणारी हुकमी एक्का अशी ओळख असणारी सावित्रीची लेक चित्रा नाबर मॅडम,आणि या पुरस्काराची मानकरी मोहिनी चाफेकर रानाप्रताप पुणे,विजया शेलार नवयुग मुंबई,वनिता तांडेल,नवयुग मुंबई यांचा सत्कार श्री घोडके बापू यांचे हस्ते संपन्न झाला,राष्ट्रीय खेळाडु  संध्या ठाकूर,अलका कारखानीस,महाराणा प्रताप पुणे ,कुमुद कागलकर सांगली सद्या स्थायिक कोल्हापूर यांचासुद्धा सन्मान मान्यवर यांचे हस्ते संपन्न झाला.


     या निमित्ताने महिला संघाचा प्रेक्षणीय सामना आझाद व्या मंडळ च्या मैदानावर पार पडला,यावेळी श्री घोडकें बापू अध्यक्ष सां जि क असो,उपाध्यक्ष अजित भोसले काका  किरण जगदाळे सचिव श्री नितिन काका शिंदे आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सांगली जिल्हा खजिनदार श्री गणेश शेट्टी अण्णा आझाद व्या मंडळाचे राष्ट्रीय खेळाडु मनोहर जाधव,गणपती कदम ,दीपक पिराळे,श्री शिंदे सर्व पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते,श्री सुरेश मालानी,बबनराव आवळे,मधुकर साळुंखे,राजू आवळे,उल्लास नायक,सतीश पवार ननु शेख,पंच आलम मुजावर,वैभव पाटील,सुरेखा पुजारी मॅडम,सर्व घोडके कुटुंबीय, कबड्डी खेळाडु,प्रशिक्षक,पत्रकार, कबड्डी संस्था चालक,कबड्डी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते,


श्री गणेश शेट्टी अण्णा यांनी कबड्डीच्या इतिहासाला उजळणी दिली सर्व महिला खेळाडु यांचा खेळ पाहता आला याचा अभिमान आहे असे ते म्हणाले,चित्रा नाबर आणि मोहिनी चाफेकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले,आणि कमी वेळेत आमचा यथोचित सन्मान सांगलीकर यांनी केला त्याबद्धल समाधान व्यक्त केले,आपले कुटुंब प्रमुख बापुनी सांगलीची क्रीडा परंपरा आम्ही यापुढे अशीच सुरू ठेऊ,आणि 

कबड्डी इतिहासाला उजाळा दिला,श्री नितिन काका शिंदे साहेब यांनी आभार मानताना सांगली जिल्ह्या कबड्डीची वाटचाल,आणि पुढील दिशा

 याबाबत सविस्तर मांडणी करून सर्वांचे आभार मानून कारेक्रमाची गोड सांगता झाली,कुमुद कागलकर मॅडम यांनी या योग जुळवून आणला त्यामुळेच कबड्डीची ही दैवते आम्हाला याची देहा,याची डोळा जवळून अनुभवता आली,आमच्यासाठी आजचा दिवस दीपावली पेक्षा मोठा होता, हा अनमोल ठेवा आम्हाला पुढील वाटचालीस हत्तीचे बळ देईल ही अपेक्षा आहे,बापूंच्या घरी चहापाणी,नाष्टा करून या गोड आठवणी मनात ठेवून सर्व मान्यवर याना जड अंतकरणाने गोड निरोप दिला. यावेळी सर्व आजी माजी क्रीडा प्रेमी आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली...

_________________________________________________________________

                 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...



त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
           


             www.nisargbhumi.com

                    8830247886

____________________________________________________________________________________