साधी राहणीमानीचा, भारी माणूस. पत्रकार मा.नंदू गुरव सर......
(हादरा न्युज नेटर्वक) दै.पुढारी चे पत्रकार मा.नंदू गुरव सर यांचा आज वाढदिवस, पण हार तुर्याला फाट्यावर मारून, वाढदिवसाच्या शुभेच्छा नाकारणारा गुरुवर्य मित्र, मुद्दाम मला भेटायला येऊ नये म्हणून, गायब होणारा पत्रकारातील गुरु, मित्र, सखा, जिवलग ,जिवाला जीव देणारा दिलदार मार्गदर्शक, म्हणून पत्रकारितेचे गुरु, तसेच दैनिक पुढारीचे पत्रकार मा.नंदू गुरव यांच्या विषयी बोलावे तेवढे थोडेच आहे. मा.नंदू गुरव सर यांना खरे म्हणजे बढाया, मोठेपणा, फुशारकी ,कधी चालत नाही. आणी जमली ही नाही.त्यांना सर म्हणले की, लगेच धावून अंगावर येतात. कोण सर, कुठला सर ,मी मित्र आहे तुझा,असे बोलतात. हे महाशय गुरुवर्य. वाढदिवसाला शुभेच्छा म्हणून फोन केला, किंवा गुच्छ दिला तर, चांगलीच कान उघडनी करतात. कधी नेटवेपणा त्यांना आवडलाच नाही. मित्रांच्या घोळक्यात राहणे. सर्वांच्या खांद्यावर हात ठेवून आपलंसं म्हणून सर्वांसोबत चालणे. एकमेकांना आधार देणे. एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होणे. हा त्यांच्या रक्तातला गुण. माझी आणि त्यांची ओळख गुरु शिष्य म्हणून पत्रकारिता शिक्षणा अभ्यासक्रम केंद्रात शांती निकेतन सांगली येथे झाली .आणि गुरु शिष्याचे नाते कधी मैत्रीत रूपांतर झाले हेच कळले नाही. परवा त्यांची आणि माझी भेट झाली. पत्रकारिता करण्याचे ठेवणीतील धडे ते मला भेटतील तेव्हा, उजळणी म्हणून नेहमीच देत असतात. फोनवरून त्यांना शुभेच्छा दिल्या तेव्हा, चांगलीच कान उघडणी केली. आज भेटायचं ठरलं होतं. पण माझ्या मनात संशय आला. हे महाशय गुरुवर्य मित्र आज मला भेटण्याचे टाळणार आहे. कारण हार तुर्याला , फाट्यावर मारून, जिवंत मित्र प्रेम जपणारा किडा, या माणसांच्या नसानसात भरलेला आहे. पुढारी ऑफिस जवळ पुष्पगुच्छ घेऊन आज गेलो असता. तर माझ्या हातावर तुरी देऊन गुरुवर्य कामात बिझी असल्याची निरोप देत, कामानिमित्त बाहेरगावी आहे. असा फोन झाला. हा त्यांच्या असा स्वभाव म्हणजे ,आजच्या युगातील माणसाला नवा विचार देणारा आहे .अशा माझ्या तत्त्वशील गुरुवर्य, मित्र पत्रकारांचे गुरु,दै पुढारीचे पत्रकार नंदू गुरव सर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा .......
शुभेच्छुक🌹🌹🌹🌹🌹
*समाजरत्न मा.नितीनभाऊ बडेकर* *संपादक हादरा* *मु.पो. कासेगाव ता. वाळवा जि.सांगली :फोन: 955 223 32 48
_____________________________________________&
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.
नंदू गुरव साहेब, आपणास आमच्याकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
संपादक लोकसंदेश न्यूज... सांगली