पत्रकारांची भूमिका सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची असली पाहिजे : सुधीर कुलकर्णी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पत्रकारांची भूमिका सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची असली पाहिजे : सुधीर कुलकर्णी




पत्रकारांची भूमिका सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची असली पाहिजे : सुधीर कुलकर्णी

 सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा 

सांगली प्रतिनिधी : सध्या डिजिटल युगात पत्रकारिता प्रचंड वेगवान झाली असली तरी सामान्य माणसाला न्याय मिळताना दिसत नाही. त्यामुळे पत्रकारांची भूमिका सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची असली पाहिजे. असे मत ज्येष्ठ पत्रकार सुधीर कुलकर्णी (बाप्पा) यांनी व्यक्त केले. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार संपत बर्गे होते.


    सांगली जिल्हा परिषदेच्या सभागृहात पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत क्षिरसागर, मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शिवराज काटकर, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, बलराज पवार, गणेश कांबळे, जालिंदर हुलवान, नंदू गुरव, प्रवीण शिंदे, तानाजी जाधव, विकास सूर्यवंशी, विनायक जाधव, कुलदीप देवकुळे, मोहन राजमाने,  चंद्रकांत गायकवाड यांच्यासह विविध दैनिकांचे पत्रकार, डिजिटल मिडियातील पत्रकार उपस्थित होते.


    राष्ट्रपती पदक विजेते शाहीर बजरंग आंबी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्यावरील पोवाडा सादर केला. शाहीर चंद्रकांत गायकवाड यांनी महाराष्ट्र गिताने कार्यक्रमाची सुरुवात केली.


   सुधीर कुलकर्णी म्हणाले, पत्रकारांनी डिजिटल युगात काळाबरोबर बदलत गेले पाहिजे. पत्रकारितेचा ध्यास घेणे चांगले आहे. परंतु  आपल्या कुटुंबाची फरफट टाळण्यासाठी व्यवसायिक माध्यमामध्ये पत्रकारांनी चरितार्थासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. सुधीर कुलकर्णी यांनी खिळे जुळवणी पासून डिजिटल माध्यमापर्यंत वृत्तपत्रे, माध्यमेआणि त्यांचे बदलत गेलेले स्वरूप यांचा  आढावा घेतला. अध्यक्षपदावरून बोलताना संपत वर्गणी काळ बदलला तरी पत्रकारितेची मूल्ये बदलत नाहीत. काही बाबींची पत्थे पत्रकारांनी स्वतःहून पाळली तर आजच्या संक्रमण सि्थतीतूनही पत्रकारिता चांगल्या स्थितीत येईल असा आशावाद व्यक्त केला.


    यावेळी उपस्थित पत्रकारांचे सत्कार करण्यात आले. "रेखा" या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या चित्रपटासह सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पत्रकार चंद्रकांत गायकवाड, कुलदीप देवकुळे, सचिन ठाणेकर यांचा, राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचे रौप्य पदक मिळाल्याबद्दल पत्रकार वैष्णवी जाधव यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल पत्रकार किरण जाधव व किशोर जाधव यांचा तर छायाचित्रकार नंदकुमार वाघमारे यांनी वेगळा क्षेत्रात केलेल्या कारकिर्दीबद्दल सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमांमध्ये लोकसंदेश न्यूज मीडियाची "दिनदर्शिका 2023" चे प्रकाशन करण्यात आले



   अविनाश कोळी यांनी स्वागत केले. सुत्रसंचलन कुलदीप देवकुळे,  बलराज पवार यांनी आभार मानले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.