नमस्कार सांगलीकर
तुम्हाला माहित आहे का ?
सांगलीत बुधगाव येथे विमानतळ आहे. या विमानतळावर एक किलोमीटर लांब धावपट्टी आहे. या विमानतळावरून १९६० ते १९७५ दरम्यान अनेक वेळा विमाने उतरली आहेत. एका खाजगी कंपनीने काही महिने सांगली ते मुंबई थेट विमानसेवा देखील चालू केली होती ज्याला सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
बुधगाव विमानतळावर उतरणारे व बुधगाव विमानतळावरून जाणारे विमान पाहण्यासाठी अनेक सांगलीकर विमानतळावर गर्दी करत असत.
आज देखील बुधगाव येथे विमानतळ अस्तित्वात आहे
वर्ष २००० पर्यंत हा विमानतळ एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया कडे होता व त्यामुळे वर्षातून काहीवेळा विमाने व हेलिकॉप्टर बुधगाव विमानतळावर उतरत होते.
सन 2000 च्या आसपास राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ने महाराष्ट्र राज्य शासनाला विनंती केली की बुधगाव येथे सुमारे २०० ते ३०० एकर जमीन दिल्यास बुधगाव विमानतळाची धावपट्टी लांब करून या विमानतळावर सुसज्ज एअरपोर्ट टर्मिनल बांधण्यात येईल.
परंतु राज्य सरकारने राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत हा विमानतळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळा तर्फेच विकसित केला जाईल असा आग्रह धरला. शेवटी कंटाळून एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने हा विमानतळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाकडे सुपूर्द केला व त्यानंतर या विमानतळावर वर्षातून एक दोनदा येणारी विमाने देखील थांबली.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने सांगलीच्या बुधगाव विमानतळाची देखभाल तर केलीच नाही. बुधगाव विमानतळाच्या धावपट्टीचे डांबरीकरण देखील त्यांनी प्रत्येक वर्षी केले नाही. वास्तविक प्रत्येक वर्षी विमानतळाच्या धावपट्टीचे डांबरीकरण तर करायलाच हवे असा नियम आहे तो नियम सुद्धा डावलला गेला. त्यामुळे तेथील डांबरी धावपट्टी आता पावसामुळे खराब झालेली आहे. बुधगाव विमानतळा च्या धावपट्टीचे डांबरीकरण लगेच करण्याची गरज आहे.
मागच्या काही वर्षांमध्ये सांगली शहराला दोन-तीन वेळा महापूर आला त्यावेळेला भारतीय नौसेना व एनडीआरएफ इंडिया चे मोठ मोठे हेलिकॉप्टर बुधगाव विमानतळावरच उतरत होते. उदगाव विमानतळावरूनच सांगलीच्या पूरग्रस्त भागांसाठी मदत पोहोचविण्यात येत होती.
बुधगाव विमानतळ हे महापुराच्या वेळी सांगलीकरांसाठी खूप मोठा वरदान ठरला होता.
आता केंद्र सरकारने देशातील प्रत्येक प्रमुख शहरांमध्ये विमानतळ असायलाच पाहिजे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा आता विमानतळे होत आहेत. व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड असायला पाहिजे असे धोरण आहे.
केंद्र सरकारचा एक जुना नियम होता की एका विमानतळापासून दीडशे किलोमीटरच्या आत दुसरा नवीन विमानतळ होऊ शकत नाही. त्यामुळे कोल्हापूरच्या काही लोकांनी सांगलीत नवीन विमानतळ होऊ नये यासाठी विरोध केला होता.
पण बुधगाव येथील विमानतळ हा स्वातंत्र्याच्या काळापासून अस्तित्वात असून या विमानतळावर विमानसेवा देखील काही वर्षे सुरू होती त्यामुळे हा नवीन विमानतळ नसून हा जुनाच विमानतळ आहे. त्यामुळे फक्त या विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करून दोन किलोमीटर लांब धावपट्टी करावी व इथून नियमित विमान सेवा सुरू करावी अशा प्रकारचा आशय एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा होता. त्यामुळे सांगलीच्या विमानतळाची धावपट्टी विस्तार करायची मागणी राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने महाराष्ट्र सरकारकडे केली होती.
आज देखील एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाला बुधगाव विमानतरळ हस्तांतरित करण्यात आले व त्यांना 200 एकर जमीन खरेदी करून राज्य शासनाने दिली तर सांगलीमध्ये एक प्रशस्त विमानतळ लवकरच सुरू होईल.
या सर्व गोष्टींची पूर्तता करून विमानतळ सुमारे एक ते दीड वर्षातच सुरू होऊ शकतो
व सांगलीकरांना सांगली मिरजच्या आकाशामध्ये पुन्हा विमाने पहायला मिळतील.
तसेच सांगलीतून मुंबई दिल्ली अहमदाबाद बेंगलुरु सुरत हैदराबाद चेन्नई कलकत्ता गुवाहाटी अशा अनेक ठिकाणी विमान सेवा सुरू होईल.
1980 सालापर्यंत विमानतळ असलेले प्रमुख शहर असा सांगलीचा जो नावलौकिक होता तो पुन्हा आपल्याला प्राप्त होणार आहे.
सांगली पेक्षा कित्येक पटीने लहान असणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग बिजापूर गुलबर्गा नांदेड जळगाव अशा लहान शहरातून देखील आता विमानसेवा नियमित सुरू आहे.
त्यामुळे सन २०२२ मध्ये जेव्हा देशातील सर्वच शहरांमधून विमाने भरारी घेत आहेत सांगली शहराने मागे राहता कामा नये.
आता केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत विमान सेवा स्वस्त झाली आहे.
त्यामुळे सांगलीत लवकरात लवकर बुधगाव विमानतळ पूर्ववत सुरू झाल्यास या विमानतळाचा खूप मोठा फायदा सांगलीकरांना होणार आहे तसेच सांगली ला बाहेरून येणारे व्यापारी उद्योजक विद्यार्थी रुग्ण यांना देखील खूप मोठा फायदा होणार आहे
सतीश साखळकर
सर्व पक्षीय कृती समिती सांगली जिल्हा.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.
______________________________________________
संपादकीय,!!!
सतीशराव सांगलीकरांच्या बाबतीत जी आपली तळमळ आहे ..त्याच्यामध्ये सांगलीचे काही तर कल्याण व्हावं असं सांगलीकरांच्या सह आपणाला देखील वाटत आहे ....परंतु आमचं दुर्दैव आहे की, आम्हाला सांगलीला कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता सांगलीच काहीतरी भलं करेल असं दिसत नाही... राजकारानातून सांगलीला संपवण्याचा घाट उतरवलेले हे सर्व लोकप्रतिनिधी, सांगलीच काहीही कल्याण करणार नाहीत.. यांना फक्त आपला पक्ष, आपली पिल्लावळं, आपली टवाळकी, सांभाळण्यातच हशील आहे ...परंतु सांगलीचे रस्ते असू देत, पाण्याचा प्रश्न असू दे, मिशन हॉस्पिटल पासून शास्त्री चौकापर्यंत चा रस्ता, सांगलीचे सिग्नल असू देत,सांगलीमध्ये एखादा चांगला मोठा एमआयडिसी प्रकल्प, कारखाने उद्योग निर्मिती, तरुणांना रोजगार ,काहीही केलेलं नाही.. व करण्याची या लोकांची मानसिकता नाही यांना फक्त सांगलीच "वाटोळ"करायच आहे आणि परत "आप आपल्या गावी ,घरी निघून जाण्याच आहे" त्यामुळे आपण कितीही सांगितलं तर ही लोक काही करणार नाहीत "आंबा" कुठे असेल तर नक्की त्याच्यामध्ये हात घालून ही लोक काम करतील, "आंबा"नसेल तर काहीही करणार नाहीत(कौलापुर विमान तळ प्रकरण) त्यामुळे आम्हा सांगलीकरांचे दुर्दैवच आहे की. असे आम्हाला लोकप्रतिनिधी लाभले, निवडणुकीच्या वेळेला सर्व जनतेने याबाबतीचा विचार करून मग कोणाला मते द्यायचे आणि कुणाला निवडून आणायचं याच्यावर आता विचार करण्याची वेळ आलेली दिसत आहे ...आपलं साम्राज्य सांभाळण्यासाठी काही लोकांना हाताशी धरून सांगलीमध्ये राजकारण होते आणि स्पष्ट दिसत आहे.. मात्र कोणत्याही नेत्यास उघडपणे आमच आव्हान आहे की, कुठल्याही पक्षाचे, कुठल्याही नेत्यांने,
सांगलीसाठी आपण काय केलं आहे?? आहे तेच रस्ते आहेत ,साधा अंकली -सांगली पर्यंत रस्ता झाला नाही. सांगली पासून पेठ रस्ता झाला नाही, विमानतळाची अशी परिस्थिती आहे ,त्याच्यानंतर सांगलीकरांना योग्य रीतीने पाणी मिळत नाही, दहा टाक्या बांधून झाल्यात असं पाणीपुरवठा च मत आहे सांगलीकराना स्वच्छ व वेळेवर पाणी मिळत नाही,म्हणजे सांगली कडे लक्षच द्यायचं नाही. . मताच्या वेळेला चार टवाळकी घेऊन दंगा करून निवडून येणं हा एकमेव कार्यक्रम या सर्व राजकारणी लोकप्रतिनिधींनी केलेल आहे . परंतु हे काय सांगलीला फायद्याच नाही .सतीश साखळकर साहेब ...आपल्या तळमळीचा खरोखर आम्ही अभिनंदन करतो ...असं एक दिवस "सांगली साठी चांगला येईल"... अशी आशा व्यक्त करतो. नमस्कार. .
सलीम नदाफ: संपादक; लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
8830247886