कवलापूर येथील विमानतळाच्या १६० एकर जागेच्या विक्रीची प्रक्रिया पूर्णपणे थांबवा. या जागेवर विमानतळ व्हावे, यादृष्टीने पुन्हा सर्वेक्षण करा. , अशी मागणी विमानतळ बचाव कृती समितीचे नेते, माजी आमदार नितीन शिंदे आणि सतीश साखळकर यांनी आज केली.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कवलापूर येथील विमानतळाच्या १६० एकर जागेच्या विक्रीची प्रक्रिया पूर्णपणे थांबवा. या जागेवर विमानतळ व्हावे, यादृष्टीने पुन्हा सर्वेक्षण करा. , अशी मागणी विमानतळ बचाव कृती समितीचे नेते, माजी आमदार नितीन शिंदे आणि सतीश साखळकर यांनी आज केली.




लोकसंदेश न्यूज नेटवर्क

सांगली, ता. ८ ः कवलापूर येथील विमानतळाच्या १६० एकर जागेच्या विक्रीची प्रक्रिया पूर्णपणे थांबवा. या जागेवर विमानतळ व्हावे, यादृष्टीने पुन्हा सर्वेक्षण करा. धावपट्टीसाठी नेमकी किती जागा कमी पडते, हे पटलावर मांडा, अशी मागणी विमानतळ बचाव कृती समितीचे नेते, माजी आमदार नितीन शिंदे आणि सतीश साखळकर यांनी आज केली यावेळी तानाजी सरगर हजर होते.


त्यांनी कवलापूर विमानतळ जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. विमानतळाची मूळ जागा, धावपट्टीसाठीचे आरक्षण, तेथील परिस्थिती याची पूर्ण माहिती घेतली. या ठिकाणी विमानतळ होण्यात नेमक्या अडचणी काय आहे, याचा आता सोक्षमोक्ष झालाच पाहिजे, असा निर्धार त्या ठिकाणी करण्यात आला. त्यासाठी विमान प्राधीकरणाकडे धडक दिली जाणार आहेच, मात्र त्याआधी औद्योगिक विकास महामंडळाने आता या जागेच्या विक्रीसाठीचा खटाटोप तातडीने थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली.


माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, ‘‘कवलापूरला विमानतळच झाले पाहिजे, यात आता दुमत नाही. कुणी काही म्हटले तरी जागेचा व्यवहार होऊ देणार नाही. ही अत्यंत मोक्याची आणि जिल्ह्याच्या विकासात महत्वाची जागा आहे. आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली,एवढी मोठी जागा पुन्हा मिळणे अशक्य आहे. त्यामुळे औद्योगिक विकास महामंडळाने घाईघाईत व्यवहार करण्यासाठी घातलेला घाट रद्द करावा.


 अन्यथा, त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला जाईल.’’
सतीश साखळकर म्हणाले, ‘‘विमानतळ प्राधीकरणाकडून ही जागा औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही अंधारात झालेली आहे. 


त्याबाबत काहीही स्पष्टता नाही. विमानतळ होऊच शकत नाही, असे म्हणताना केवळ जागा अपुरी आहे, असे कारण असेल तर मग आवश्‍यक अतिरिक्त जागा खरेदीत अडचणी काय आहेत? राष्ट्रीय महामार्ग बनवताना सगळी जागा सरकारची आहे का? विमानतळ प्राधीकरण तर गरजेनुसार काही पट किंमत देऊन जागा खरेदी करत असते. त्यामुळे गरज पडली तर गरजेनुसार जागा खरेदी शक्य आहे. त्याबाबत आधी सर्वेक्षण करावे. धावपट्टी किती उपलब्ध आहे, हे पहावे. ते जनतेसमोर मांडावे.’’

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली