"सबका साथ सबका विकास" बोलणारी भाजपा *सांगली का विनाश - कोल्हापूरका विकास* हा कार्यक्रम भाजपा राबवत आहे.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

"सबका साथ सबका विकास" बोलणारी भाजपा *सांगली का विनाश - कोल्हापूरका विकास* हा कार्यक्रम भाजपा राबवत आहे.



"सबका साथ सबका विकास"
बोलणारी भाजपा 
*सांगली का विनाश - कोल्हापूरका विकास* 
हा कार्यक्रम भाजपा राबवत आहे.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी सांगलीत येऊन "सांगली बनवू चांगली" अशी घोषणा करून गेले......

त्याला प्रतिसाद देत सांगली जिल्ह्याच्या भोळ्या जनतेने लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत अशा सर्वच ठिकाणी भाजपाला भरघ़ोस मते दिली.

पण भाजपाने सांगलीला संपवून टाकण्याचा नियोजनमय कार्यक्रमच आखला आहे.


१) ज्या कोल्हापूर जिल्हाने एकही भाजपा खासदार निवडून दिला नाही त्या कोल्हापूर जिल्ह्यात रू ३०० कोटी खर्च करून भव्य दिव्य विमानतळ भाजपाने सुरू केले.

२) रुपये ५ हजार कोटी खर्चाच्या पुणे-लोंढा रेल्वे मार्ग दुहेरीकरण प्रकल्पात बेळगाव रेल्वे स्टेशन नविन ईमारत व टर्मिनल साठी रू २०० कोटी खर्च केले. पण सांगली रेल्वे स्टेशनवर नवीन ईमारत किंवा टर्मिनल सुविधा भाजपाने होऊ दिली नाही. 


३) मिरज ज़ंक्शन येथे मंजूर झालेली रेल्वे कोच फॅक्टरी याच भाजपाने लातूरला नेली. त्यामुळे लातूरच्या ५० हजारपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला. लातूरचा रेल्वे कारखाना सुरू देखील झाला.

५) सांगली-आष्टा-ईस्लामपूर-शिराळा-रतनागिरी रेल्वे मार्ग मंजूर करण्याऐवजी कोल्हापूर-वैभववाडी‌ रेल्वे मार्ग भाजपाने मंजूर केला.

६) देशभरात भाजपाने १००० नविन रेल्वे गाड्या सुरू केल्या पण सांगली रेल्वे स्टेशनवरून एकही नविन रेल्वे गाडी‌ भाजपाने सुरू केली नाही. 

७) देशातील १०० शहरांना स्मार्ट सिटी केले पण देशात पहिल्या ६० शहरात स्थान असलेल्या सांगली शहराला भाजपानेच स्मार्ट सिटीतून वगळले. 


८) देशात ५० नवे एम्स हॉस्पीटल सुरू झाले पण सांगली-मिरज मध्ये एम्स हॉस्पिटल भाजपाने होऊ दिले नाही.

९) देशातील अनेक शहरात आयआयटी संस्था स्थापन करण्यात आल्या पण भाजपाने सांगलीत आयआयटी पण होऊ दिली नाही.


१०) उच्च न्यायालयाचे खंडपिठ सांगलीत न करता कोल्हापूरला करणारी भाजपाच आहे.

११) सांगलीच्या वारकरी संप्रदायला पंढरपूर जाण्यासाठी सांगली-पंढरपूर रेल्वे गाडी देखील भाजपाने सुरू होऊ दिली नाही.

१२) सांगली जिल्हातील दुष्काळी जत व कवठेमहांकाळ तालुक्यात शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज असताना भाजपाने त्याविरोधात कोल्हापूरात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. 


१३) जगातील सर्वात मोठी हळद बाजारपेठ असणार्या सांगलीत हळद संशोधन केंद्र भाजपाने सांगलीत केले नाही त्यामुळे ते ईतर जिल्ह्यात गेले.‌ आता सांगलीची हळद बाजारपेठ देखील भाजपामुळे लवकरच संपेल.

१४) भाजपा सतेत येण्याआधी सुरू होणार्या सर्व रेल्वे गाड्यांना सांगली, मिरज व किर्लोस्करवाडी या तिन्ही स्थानकांवर थांबा मिळत असे. पण भाजपाने सांगली व किर्लोस्करवाडी स्थानकांमध्ये अनेक रेल्वे गाड्यांचे थांबेच काढून टाकले. सांगलीत विमानतळ तर नाहीच आता नविन रेल्वे गाड्या देखील सांगली स्थानकावर थांबणार नाहीत अशी अवस्था सांगलीची झाली आहे.


१५) मेक ईन ईंडिया अंतर्गत लाखो-करोडो रूपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली. पण भाजपाने सांगलीत एकही‌ नविन उद्योग येऊ दिला नाही.

१६) देशभरात अनेक शहरात आयआयएम उच्च शिक्षण संस्था सुरू करण्यात आल्या पण याच भाजपाने सांगलीत आय आय एम होऊ दिले नाही.


१७) तासगाव हे द्राक्ष उत्पादनाचे राज्यातील प्रमुख केंद्र असताना द्राक्ष संशोधन केंद्र देखील भाजपाने तासगावात केले नाही.

१८) एस एस सी बोर्ड, विद्यापीठ, विमानतळ, महावितरणचे झोन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे झोन/मंडळ, पोलीस आयुक्तालय, वन विभाग क्षेत्रीय कार्यालय,‌ राष्ट्रीय राजमार्गचे क्षेत्रीय कार्यालय, आयकर विभागाचे क्षेत्रीय आयुक्त, आरटीओ प्रादेशिक आयुक्त असे सर्वच काही कोल्हापूरातच आहे. पण सांगलीत राज्य शासनाचे एकही क्षेत्रीय कार्यालय भाजपाने सांगलीत आणले नाही. 

१९) सांगलीतील विमानतळ, रेल्वे‌ स्टेशन शेती, व्यापार, उद्योग, रस्ते, ईत्यादी सर्व काही संपवून दुय्यम दर्जा सांगलीला देण्याचे काम भाजपा करत आहे.

२०) सांगली पेक्षा लहान क्षेत्रफळ व कमी लोकसंख्या असलेल्या गुलबर्गा,‌ बेलारी,‌ रत्नागिरी, जळगाव, नांदेड, विजयापूर, सिंधुदूर्ग,‌ शहरात विमानतळ सुरू केले. एकूण २२० नविन विमानतळ देशात सुरू करणार आहेत.  पण सांगलीचे विमानतळ भाजपाला नक़ो आहे. भाजपाच सांगली विमानतळ संपवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाचे नेते सांगलीतून फक्त मते घेतात व ईतर जिल्ह्याचा विकास करतात.

२१) गेल्या ८ वर्षांपासून भाजपा फक्त घोषणाच करत आहे की सांगली जिल्ह्यात ड्रायपोर्ट करणार पण तिथले काम देखील भाजपाने सुरू केले नाही.

२२) देशात भाजपाने अनेक नविन रेल्वे मार्ग मंजूर केले पण विटा, तासगाव या महत्वपूर्ण शहरांसाठी रेल्वे मार्ग देखील भाजपाने मंजूर केले नाही.

एकूणच भाजपा सांगली विरोधी आहे हे सांगली जिल्ह्यातील लोकांना कळले आहे.

सतीश साखळकर
सर्वपक्षीय कृती समिती सांगली...
_________________________________________________

संपादकीय..,...
सांगलीची जनता सुज्ञ आहे, भोळी आहे काही अंशाने वेडी पण आहे ...एखाद्यावर त्यांनी प्रेम केलं तर त्याला उचलून डोक्यावर घेण्यात ते कमी करत नाहीत.. परंतु ज्या दिवशी त्यांना कळेल की,  हे सर्व नेते ,लोकप्रतिनिधी.  मताच्या राजकारणासाठी करत आहेत... त्या वेळी पायाखाली सुद्धा घेण्यास कचरत नाहीत... याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे वसंतदादा हयातीत असताना त्यांचा झालेला पराभव... विष्णू अण्णांचा पराभव... आणि परत संभाजी आप्पा पवार यांचा पराभव...अशी बरीच उदाहरण देता येतील की, सांगलीकर जनता  सुज्ञ आहे ,कस आहे... सांगलीला महापालिका करून अण्णासाहेब डांगे आपल्या राजकारणातून इस्लामपूरला निघून गेले.... त्यावेळी देखील आणि आज देखील सांगली ही महापालिकेच्या लायकीची  नव्हती व नाही...  
कोणतेही कारण नसताना भौगोलिक स्थिती नसताना देखील
मिरज आणि कुपवाड जोडले जाऊन महापालिका  केली परंतु त्या महापालिकेमध्ये




 कोणत्याही सुविधा आजतागायत दिल्या गेलेल्या नाहीत, मात्र नागरिकांच्या वर महापालिकेचे सर्व कर सर्व टॅक्सेस आकारले गेले त्याचे भोग सांगलीकर जनता भोगत आहे...

सांगलीच्या लोकप्रतिनिधीना आम्ही काही रक्कम गोळा करून देतो... त्यांनी अकलूज जाऊन बघून यावं... कोल्हापूर जाऊन बघून यावं... सोलापूर, बारामती जाऊन बघून याव.... महापालिका काय असते हे त्यांना कळून येईल ...परंतु यांना सांगलीसाठी हशील नाही.. मग तो कोणत्याही पक्षाचा असो .. सांगली बद्दल आस्था नसणारी   ही जे बाहेरची लोक आलेली आहेत... सांगलीमध्ये लोकप्रतिनिधी बाबत म्हणून आम्ही वारंवार सांगतो की, "सांगलीच वाटोळ केल्यानंतर" हम झोला लेके"  आमच्या गावी जाण्यासाठी तयार आहोत. .   
  
सांगली महापालिका झाल्यानंतर कोणतं मोठं भरीव काम झालं आहे हे इथल्या आजी आणी माजी लोकप्रतिनिधीनी जाहीरपणे स्टेजवर येऊन सांगावं. ..  रस्ते, लाईट ,पाणी, पुराची परिस्थिती, आणि उद्योग व्यवसाय सगळं सगळं जवळ जवळ धुळीला मिळालेल आहे, आता आपली पिल्लावळ परत सांगली मध्ये उतरवण्याचा यांचा घाट आहे ...परंतु आम्हाला कोणत्याही पक्षाला दोष द्यायचा नाही .. सांगलीकरांच दुर्दैवच आहे की, सांगलीला कुणी चांगला नेता आज तरी दिसत नाही.

 सतीशराव.. आपण विमानतळाचा मोठा मुद्दा उपस्थित केला, कोल्हापूर रस्त्याचा, घनकचऱ्याचा, मोकळ्या भूखंडांचा, असेही अनेक विषय वर आपण सातत्याने लढत आहात,
 विमानतळ का असावे,   याच ज्वलंत उदाहरण म्हणजे कोल्हापूर ...सांगलीला महामार्ग कनेक्टिंग असावा .. त्यामुळे सांगलीची प्रगती होणार आहे परंतु कोणाही प्रतिनिधीला सांगलीची प्रगती करायची नाही.. फक्त आपल राजकारण करायचं आहे ....वर वर दिसणारे विरोधी व सत्ताधारी पक्षातील नेते सर्व एकमेकांच्या विरोधात दिसतात मात्र सर्वजण आतून एकच आहेत....
हे आपण प्रत्येक निवडणुकीत पाहिलेल आहे .... 
(कधी कधी त्यांचा निवडणुकीच्या आदल्या दिवशी मोबाईल देखील हॅक होतो)

 त्यांनी जाणून बुजून सांगलीच "वाटोळ" करण्याचं ठरवलेलं आहे ...आता हे कळायलालागले आहे.. जनता सुज्ञ झाली आहे... कोणत्याही लोकप्रतिनिधी व नेत्यांन किंवा   प्रमुख अधिकाऱ्यांनी चमकोगिरी करूनच इथून निघून गेलेले आहेत.. परंतु सांगलीत काय कल्याण झालेलं नाही, असो.... सतीश राव तुमच्या विचारांची माणसं तुमच्या पाठीशी आहेत ,असंच तुम्ही   दुर्दैवी सांगली साठी आपण प्रयत्न करत रहा... सांगलीकर सुज्ञ जनता आपल्या  पाठीशी आहोत... धन्यवाद !!!.

 आपला :सलीम नदाफ; संपादक, लोकसंदेश न्यूज मीडिया प्रा लि. मुंबई, /सांगली
8830247886