लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे देशभक्त माजी आमदार स्वर्गीय धुळाप्पांना भाऊराव नवले यांची जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले
प्रारंभिक जिल्हा काँग्रेसचे खजिनदार पी. एल. रजपूत व जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अजित शिरगावकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले पि.एल.रजपूत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वर्गीय धुळाप्पांना नवले यांनी काँग्रेस कमिटी उभी करण्यात मोलाचे योगदान दिलेल आहे त्यांनी दक्षिण सातारा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच स्वातंत्र सैनिक समितीचे अध्यक्ष दक्षिण सातारा लोकल बोर्ड चे लोकनियुक्त अध्यक्ष म्हणून काम केले त्यांच्या कारकिर्दीमध्ये काँग्रेस भवन उभी राहिली, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांनी ही जी जबाबदारी त्यांना दिली ती अत्यंत चोखपणे त्यांनी पार पाडली ,स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्याबरोबर अत्यंत सलोख्याचे संबंध त्यांचे होते
यावेळी स्वागत प्रास्ताविक करताना अजित ढोले यांनी आदरणीय धुळाप्पांना नवले यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी जे कार्य केले त्यामध्ये विशेषता सेवा दल कार्यकर्ते यांना शिबिराच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी कार्य केल्याचे व त्यांच्या काळामध्ये स्वामी रामानंद भारती आणि धुळाप्पांना नवले यांनी सेवा दल वाढीसाठी काम केले आहे त्या काळातील सेवा दल उभी करून काँग्रेस पक्ष बळकट करणे हीच त्यांना आदरांजली आदरांजली ठरेल असे त्यांनी मनोगत व्यक्त केले
शेवटी आभार विश्वास यादव यांनी मांडले यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अजित शिरगावकर, विजयराव नवले, विठ्ठलराव काळे , बाबगोंडा पाटील सुरेश गायकवाड, ॲड.भाऊसाहेब पवार, सेवादलाचे प्रदेश सचिव पैगंबर शेख,उदयराव नवले ,प्रशांत पाटील गजानन मिरजे, सायमन आवळे, श्रीराम हिंगमिरे ,अर्जुन कोकाटे, ॲड.कुमार पाटील , माजी तहसीलदार अंकलीकर ,महावीर मुंडे, स्वाती भस्मे, रामदास कोळी, हरीश पुजारी, शमशाद नायकवडी, जन्नत नायकवडी, शैलेंद्र पिराळे, देशभूषण पाटील, झाकीर मुजावर, मालगावचे लखन माळी, पलूसचे प्रदीप माने, वाळवा शांतकोटी नागराज एकनाथ पडळकर आटपाडी राजू वडकीले, जत अरुण पळसुळे, सुभाष पट्टणशेट्टी ,सीमा कुलकर्णी ,जुबेदा बिजली,इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी सेवा दलाच्या वतीने व अपंग सेलच्या कार्यक्रम संपन्न झाला
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली