डी पी सी हॉल सांगली मध्ये दी 13/1/2023 रोजी आयोजित करण्यात आली होती
त्याचे औचित्य साधून ...
सांगली जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ चा प्रचार व प्रसाराच्या
अनुषंगाने मा.पालक मंत्री व जिल्ह्यातील सर्व माननीय खासदार व माननीय आमदार यांना मा. जिल्हाधिकारीसो यांचे हस्ते पौष्टिक तृणधान्याचा लोगो असलेल्या बॅग मध्ये जत तालुक्यातील माडग्याळची
देशी बाजरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, बाजरीची बिस्किटे, माडग्याची बोरे , गुळपोळी,देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
मकर संक्रांति पूर्वी कृषी विभागाने हा एक वेगळ्या प्रकारचा वान सर्वांना दिला आणि यातून पौष्टिक तृण धान्याचा प्रचार लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन केला.
या कार्यक्रमास खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, प्रकल्प संचालक दिपक चव्हाण यांच्यासह गटविकास अधिकारी उपस्थित होते
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.