गुलाबराव पाटील यांचा जनसेवेचा वारसा पृथ्वीराज पाटील चालवतील
-- जयंत पाटील
सांगली, दि. १३ : सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांचा जनसेवेचा वारसा पृथ्वीराज पाटील चालवतील, असे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. जयंत पाटील यांनी येथे बोलताना केले.
सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या यशोधन सेवा व संपर्क कार्यालयास श्री. जयंत पाटील यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
श्री. पृथ्वीराज पाटील यांनी सांगली - मिरज रोडवर नुकतेच सुसज्ज असे यशोधन सेवा व संपर्क कार्यालय सुरू केले आहे. त्याची माहिती व देण्यात येणाऱ्या सेवांची त्यांनी माहिती घेतली व कार्यालयाची प्रशंसा केली. या वेळी उपस्थित असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याशी आपल्या नेहमीच्या शयलीत हास्य विनोद केले.
यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, संजय बजाज, पद्माकर जगदाळे, सुरेश पाटील, शेखर माने, गटनेते मैनुद्दीन बागवान, विक्रम कदम, रवी खराडे, सनी धोतरे, अजय देशमुख, विजय आवळे, संजय सूर्यवंशी, सचिन कोळी, महावीर पाटील, अल्ताफ पेंढारी, विजय पाटील, युवराज पाटील, प्रश्नांत देशमुख, अय्युब निशानदार, प्रदिप पाटील, आशीष चौधरी, व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली
------