लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली,
दि. ३:
खोतवाडी ओढ्यावरील पुलाच्या कामाचा शुभारंभ...
बिसूर, बुधगावसह अनेक गावांची सोय
- पृथ्वीराज पाटील
सांगली, दि. ३:
निमणी नागाव, खोतवाडी, बिसूर, बुधगाव या गावांसाठी असलेल्या रस्त्यावरील खोतवाडीच्या ओढ्यावरील पुलाच्या बांधकामाचा आज सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झाला.
या पुलासंदर्भात माहिती देताना श्री. पाटील म्हणाले, या पुलाच्या कामासाठी १.७५ कोटी रुपयांचा निधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केला होता. हा निधी आपल्या मागणीवरून मंजूर झाला होता.
ते म्हणाले, हा रस्ता खोतवाडीच्या ओढा पात्रातून जातो. ओढ्याला पूर येतो, त्यावेळी वाहतुकीला खूप मोठा अडथळा निर्माण होतो. संपूर्ण पावसाळ्यातच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. या रस्त्यावरील दोन्ही बाजुच्या गावांचा संपर्क तुटतो. सांगली शहराशीही त्यांचा संबंध तुटतो, त्यामुळे या पुलाचे काम होणे अत्यंत गरजेचे होते. त्याकरिता नाबार्ड - २७ अंतर्गत आपण निधी मंजूर करून आणला होता. नाबार्ड कडून त्याला मंजुरी मिळाली होती.
या पुलामुळे या पंचक्रोशीतील लोकांच्या दळणवळणाची चांगली सोय होणार आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
यावेळी कॉंग्रेस किसान सेलचे अध्यक्ष महावीर पाटील म्हणाले, खोतवाडी पुलासाठीचा निधी पृथ्वीराज पाटील यांनी मंजुर करून आणला आहे. उद्या भाजपवाले या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतील, परंतु हातच्या काकणाला आरसा कशाला म्हणुन, आम्ही मंजुरीच्या पत्रासह आणि त्यावेळच्या बातमीसह डिजीटल लावले आहे. त्यामुळे खोट्या वल्गनांना खोतवाडीचे सुज्ञ नागरीक बळी पडणार नाहीत.
सदर पुलाचे काम कत्रांटदार कबाडे हे करीत आहेत. या कार्यक्रमास सरपंच संजय सूर्यवंशी, अजित कांबळे, दशरथ मुळीक, हिम्मत पाटील, अरविंद भोसले, मधुकर कालेकर, जालिंदर कदम, नांद्रेचे महावीर पाटील, बिसुरचे विजय जयवंत पाटील, विजय प्रताप पाटील, योगेश पाटील, जग्गनाथ शिंदे, सुहास मुळीक, निवास पाटील, अनंत पवार, विजय पाटील, विनोद खामकर, बाबा पाटणकर, पतंग शिंदे, वसंत खोले, निलेश पाटील, सुरेश मुळीक, भरत शिंदे, सचिन पाटील, जालिंदर जगताप, नेताजी सूर्यवंशी, सुभाष पाटील, उदय खोले, ग्रामसेवक सुहास कुंभार, कंत्राटदार कबाडे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, अधिकारी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.
---
_____________________________________________________________
नवं वर्ष 2023 च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
या बातमीचे प्रायोजक आहेत. ...
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
&
AMMU AUTO PARTS PVT LTD.
MUMBAI.
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व युजड व न्यू र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
हेड ऑफिस: महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्राइवेट लिमिटेड, महाराष्ट्र स्क्रॅप शंभर फुटी रोड नुराणी मशीद जवळ सांगली.
कार्पोरेट ऑफिस; महाराष्ट्र ऑटोमोबाईल्स,सुपरवाला मार्केट, शॉप नं 9,अंतिकाबाई जोशी मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई.
9850516355
www.caroldpart.com
__________________________________________________________________