रोजगार मेळावा मिरज येथे 12 जानेवारीला....
सांगली दि. 6 :- बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीकोनातून रोजगार मेळाव्याचे ऑफलाईन आयोजन गुरूवार, दि. 12 जानेवारी 2023 रोजी प्रधानमंत्री कौशल्य केंद्र, श्री सिध्दीविनायक गणपती कॅन्सर हॉस्पीटलच्या समोर, सांगली मिरज रोड, मिरज येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी समक्ष उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.
या मेळाव्यामध्ये नियमीत एकूण 200 पदे भरण्यात येणार असून यामध्ये सांगली जिल्ह्यातील वेस्टर्न प्रसिकॉस्ट प्रा. लि., कामधेनू ॲग्रोवेट, रोटाडाईन टुल्स प्रा.लि, सह्याद्री मोटार्स प्रा.लि. सांगली, विजय टेक्नो इंडस्ट्रीज तसेच फडके इंजिनिअरींग प्रा. लि. मिरज इत्यादी विविध नामवंत कंपन्यानी सहभाग नोंदवला आहे. एएससी, एचएससी, बीएस्.सी , ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रुज्युएट, आयटीआय, डिप्लोमा, बीई इत्यादी शैक्षणिक पात्रतेची पदे भरण्यात येणार असून असून उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अप्लॉय करावे, असे आवाहन श्री. करीम यांनी केले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.
_____________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. ...
कौशल्य इंडिया ची मार्गदर्शक कंपनी....
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
&
AMMU AUTO PARTS PVT. LTD.
MUMBAI.
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व युजड व न्यू र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
हेड ऑफिस: महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्राइवेट लिमिटेड, महाराष्ट्र स्क्रॅप शंभर फुटी रोड नुराणी मशीद जवळ सांगली.
कार्पोरेट ऑफिस; महाराष्ट्र ऑटोमोबाईल्स,सुपरवाला मार्केट, शॉप नं 9,अंतिकाबाई जोशी मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई.
9850516355
www.caroldpart.com
__________________________________________________________________