भारतातल्या 1150 वृद्धाश्रमांपैकी एकातही एकही मुस्लिम नाही, असे का*?
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपली संस्कृती जगांत महान आहे. हिंदू संस्कृती महान आहे. देशात महाराष्ट्राला सर्वात पुरोगामी मानले जाते पण हे खोटे आहे.
एका अहवालानुसार भारतात ११५० वृद्धाश्रम आहेत व या वृद्धाश्रमांत ९७ हजार वृद्ध लोक राहतात. महाराष्ट्रात २४ वृद्धाश्रम मातोश्री वृद्धाश्रम योजने अंतर्गंत विना अनुदान तत्त्वावर चालवले जातात. स्वत:ला सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यात सर्वात जास्त म्हणजे ६५ वृद्धाश्रम आहेत.
महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे. पैकी १ कोटी वृद्ध लोक आहेत. हिंदूंना लाज वाटली पाहिजे की, समाजाला वृद्धाश्रमांची का गरज पडते ?
आई वडिलांना न संभाळण्याची कुवृत्ती समाजात वाढलेली दिसून येते.
या ठिकाणी मुद्दाम नमूद करावे वाटते की, भारतातील सर्वच्या सर्व म्हणजे ११५० वृद्धाश्रमांत एकही मुस्लिम वृद्धाश्रम नाही. अहवालानुसार मुस्लिम समाज आईवडिलांना सांभाळतात व त्यांची देखभाल करतात. कुराणमध्ये अल्लाह नंतर आईवडिलांच्या चरणी जन्नत आहे असे ते समजतात. त्यामुळे मुस्लिम समाजाचा अगदी नावांलाही वृद्धाश्रम नाही आणि तशी गरजही नाही.
मात्र हिंदू समाजाचे सर्वत्र जिकडे तिकडे अनाथाश्रम व वृद्धाश्रम दिसतात. सरकारलाही वृद्धाश्रम काढण्याची आवशकता भासणे ही अत्यंत लाजिरवाणी व शरमेची बाब आहे. वृद्धाश्रम व अनाथाश्रम हा हिंदू संस्कृतीवरचा कलंक आहे. आपले *आई वडील मुलांना जड व्हावेत इतकी नीच वृत्ती समाजात वाढली आहे.*
पुणे या बाबतीत तर नंबर एक वर आहे सर्वात जास्त वृद्धाश्रम पुण्यांत आहेत.
वैद्यकीय शास्त्रांतील प्रचंड प्रगतीमुळे नवसंशोधित उपचारांनी *वयोमान वाढले आहे.* पण माणसांतील *ओलावा माणूसपण मात्र पार आटला आहे.* लोकांच्या घरातील *कुत्री गलेलठ्ठ झाली आहेत आणि मातापिता आठ आठ दिवस उपाशी राहतातत.*
काय झालंय काय या *गाबडयांना ?*
यासाठीच का जन्माला घातले होते का त्यांनी ?
शांतपणे विचार करा देशांत एकही वृद्धाश्रम मुस्लिमांचा नाही यावरुन काय बोध घ्याल बोला?
श्रावण बाळ योजना आणावी लागते.
संजय गांधी निराधार योजना राबवावी लागते.
कुठे तो श्रावण बाळ, कुठे आजची *बिलंदर बाळे ?*
बरेचसे *बैलोबा म्हणतात बायको* ऐकत नाही.
*ती आणि तू सुद्धा एक दिवस म्हातारे होणार आहातच ना ?*
हे विसरू नका
*पोरगा उच्च शिक्षित आणि बायको डिग्रीवाली तरी जन्मदात्यांनाच विसरलात.*
कशाला जन्माला घालायची असली *हरामखोर औलादि ?* त्यापेक्षा बिन औलादीचे रहा ! काय हरकत आहे ?
सामाजिक जबाबदाऱ्या शिकवल्याच जात नाहीत आणि एक मुलगा एक मुलगी पॅटर्न आल्याने काय झाले, *एकुलता एक म्हणून दिवट्याचे फारच लाड होत असतात.*
आणि तोच घातक ठरत असतांना दिसत आहे.
*आई-वडील एकच दिवटा आहे म्हणून मुलांच्या अनेक चुका दुर्लक्षित करत असल्याने ते गाबडं उदंड आणि उनाड होत चालले आहे.*
जरा आवरा लाडल्याला ! नसता, हा लाडला तुम्हांलाच लावील धक्क्याला !
काय माहिती असते की मोठा होऊन लग्न झाल्यावर हे *दिवटे* जन्मदात्यां सोबत असे वागतील यांची पाय गुण जन्म झाल्यावरच कळाले असते तर यांना लहानपणीच बालसुधार गृहात भर्ती करून द्यायला पाहिजे होते म्हणजे जन्मदात्यांना म्हातारपणी पच्छताप करण्याची वेळच आली नसती हो!
संस्कार द्या तरच वृद्धाश्रमें कमी होतील..! नसता, भयानक वास्तव आ वासून येत आहे. लक्षांत ठेवा.
सौजन्याने...
जास्तीत जास्त शेअर करावे
जेने करून वृद्धाश्रमें कमी होतील,? खरोखरच जर आपल्याला लाज, लज्जा, असेल तर पुढे सर्व गृप वर पाठवा, जेणेकरून अशी औलाद जन्माला नकोचं,🙏🌹 जय हिंद 🌹🙏
*विद्रोही समाज संघटना अमरावती*
__________________________________________________
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.
_________________________________________________
संपादकीय,
वरील लेख वाचला डोळ्यात पाणी आलं... आई वडील ...आपण लहान असताना आपल्या तोंडातील घास आपल्याला चारून त्यांनी मोठे केलं... त्यांनी स्वतःच्या कपड्याची किंवा चपलेची कदर केली नाही ...पण माझ्या मुला मुलींना परिस्थिती नसतांना सुद्धा चांगले कपडे,चांगले चप्पल घेऊन दिल्याने ते फाटक्यातच् राहिले.. ह्यांना शिक्षित केलं... परंतु ही शिक्षित झालेली काही "आवलाद" परत आपल्या काखेत "बाईली" आल्यानंतर आई-वडिलांच्या पासून दूर झाली.... अर्ध्या हळकुंडान शहाणी झालेली ही "अवलाद" उच्च पदावर असते, या उच्च पदावरील अवलादी भ्रष्टाचारात मग्न असतात, वरील लेखात म्हटल्यासारखे त्यांची कुत्री गेलेलठ्ठ असतात ,परंतु ही "अवलाद" आई-वडिलांना आपल्या भावाकडे आपल्या बहिनी कडे लक्ष देत नाहीत.. त्यामुळे आई-वडिलांना वृद्धाश्रमात राहण्यास मजबूर करणारी "अवलाद" सकाळ सकाळी बरमोडा घालून कुत्री फिरवणार आणि शायनिंग मारत दिवसभर चार चाकी मधून फिरणारी "अवलाद".... आई-वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आपल्याला शिक्षित केलं परिस्थिती नसताना देखील आपण या उच्च पदावर आलो किंवा मोठा व्यवसायिक झालो याची खंत जाणीव त्यांना नसते.... इस्लाम धर्मात म्हटले आहे "मां के पैरो तले जन्नत'' आहे और बाप जन्नत का दरवाजा है... ही शिकवण आता त्याला कोण देणार ....प्रत्येक माणसाने आपल्या अंतरात्म्यास विचारावं की, मी माझ्या आई वडिलांसाठी काय केलं ...आम्ही पाहिलेल आहे सांगलीमध्ये 35 ट्रक असलेले एक मोठं ट्रान्सपोर्ट होतं सांगली- अहमदाबाद अशी त्यांची ट्रक व ट्रान्सपोर्टची श्रृंखला होती या गुजराती कुटुंबियाने व त्यांच्या वारसांनी त्यांना वृद्धाश्रमात धाडलं ...आता आपल्या आई-वडिलांनी एका ट्रक पासून 35 ट्रक व सांगली पासून आमदाबाद पर्यंत एक ट्रान्सपोर्टची श्रृंखला निर्माण केले, एवढा मोठा व्यवसाय केला, परंतु त्यांचा निवृत्तीचा वृद्धापकाळ वृद्धाश्रमात जाणे... यासारखे लज्जास्पद काय असू शकते... हे सर्व सांगलीकरानी पाहिलेल आहे ...सर्व धर्मात आई-वडिलांच्या प्रति आदरच सांगितलेला आहे परंतु तो आचरणात आणणे आपल्या हातात आहे तो जर आचरणात नाही आणला तर...
या अवलादीनी विसरून गेलेले की ते पण म्हातारे होणार आहेत ...तर सर्वांना आमची कळकळीची विनंती राहील ....दोन पैसे खर्च होतील... आपण जरी व्यवसायासाठी, नोकरीसाठी, उच्च पदावर असाल बाहेर असाल तरी आई-वडिलांच्या प्रति आपली सामाजिक बांधिलकी आहे... ती जपणे गरजेचे आहे... त्याला आपण टाळू शकत नाही... याचा बोध सर्वांनी, सर्वोच्च पद अधिकारी आणि नोकरदारांनी व व्यवसायिकांनी घेणे गरजेचे आहे,,, असं म्हणतात की त्याचा ही "हिसाब किताब" होणार आहे ...ज्या ठिकाणी एकत्रित कुटुंब आहे तिथे ही संकल्पना लागूच होत नाही.... आपल्या मुलांना नातवंडांना आपल्या घरातील आई वडील आजा आजी हे सर्व एकत्रित राहिल्यामुळे त्यांचे जीवन सुखकर होते... परंतु या अती शिक्षित व पैसे वाल्यांना आपण काय सांगणार ....असो...
बाबांनो आपण कितीही थोर असा.. किती उच्च पदस्थ असा.... किंवा गरीब असा.... आपल्यावर आपल्या आई वडिलांची जबाबदारी आहेच याच भान ठेवून आपण वागाव .....
धन्यवाद
आपला: सलीम नदाफ, संपादक लोकसंदेश न्यूज मीडिया सांगली.