लोकसंदेश न्यूज नेटवर्क
1 एप्रिलपासून नऊ लाख सरकारी वाहने भंगारात.
..........नितीन गडकरी
दिनांक : 30-Jan-2023
नवी दिल्ली,
केंद्र तसेच राज्यांच्या अखत्यारितील 15 वर्षे उलटून गेलेली सुमारे नऊ लाख वाहने तसेच बसेस येत्या 1 एप्रिलपासून रस्त्यांवर धावणार नाहीत, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक़ व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सोमवारी फिक्की संघटनेच्या कार्यक्रमात दिली.
केंद्र व राज्यांच्या अखत्यारितील 15 वर्षांपेक्षा जुनी वाहने हद्दपार करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने घेतला होता. त्यानुसार अशी जवळपास नऊ लाख वाहने 1 एप्रिलपासून हद्दपार होणार असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. राज्यांच्या अखत्यारितील वाहनांसोबतच राज्य परिवहन मंडळ आणि सार्वजनिक कंपन्यांच्या मालकीच्या 15 वर्षांपेक्षा जुनी वाहने हद्दपार होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
इथेनॉल, मिथेनॉल, जैव सीएनजी, जैव एलएनजी तसेच इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, सरकारच्या अखत्यारितील गाड्या हद्दपार केल्यानंतर त्यांची जागा ज्या नव्या गाड्या घेतील, त्या पर्यायी इंधनावर धावणार्या असतील. सौर ऊर्जा देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. अशा स्थितीत इलेक्ट्रिक वाहनांत सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. लांब पल्ल्यासाठी धावणार्या ट्रकसाठी एलएनजी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
एकदा एलएनजी टाकी भरली की 1400 किमी धावेल, अशा एलएनजी ट्रकचे उद्घाटन अलिकडेच मी केले आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
_____________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. ...
कौशल्य इंडिया ची मार्गदर्शक कंपनी....
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
&
AMMU AUTO PARTS PVT. LTD.
MUMBAI.
सर्व प्रकारच्या कार व जुनी 4 व 6 व्हीलर वाहने खरेदी करणारी ISO - 9001-2015 रजिस्टर कंपनी...
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व युजड व न्यू र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
हेड ऑफिस: महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्राइवेट लिमिटेड, महाराष्ट्र स्क्रॅप शंभर फुटी रोड नुराणी मशीद जवळ सांगली.
कार्पोरेट ऑफिस; महाराष्ट्र ऑटोमोबाईल्स,सुपरवाला मार्केट, शॉप नं 9,अंतिकाबाई जोशी मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई.
9850516355
www.caroldpart.com
__________________________________________________________________